महात्मा फुले कृषी विद्यापीठराहुरीचे माजी कुलगुरू कर्नल डॉ. पी. जी. पाटील यांच्या निधनानंतर कुलगुरू पदाचा पदभार डॉ. गडाख यांचेकडे सोपविण्यात आला होता.
राज्यपालांच्या मान्यतेने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्याकडे राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आलेला होता.
तब्बल ११ महिन्यांनी राहुरी विद्यापीठाला आता पूर्णवेळ कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली आहे. तसा आदेश राज्यपाल सचिवालयाकडून जारी करण्यात आला आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या कुलगुरूपदी डॉ. विलास खर्चे यांच्या नियुक्तीचा आदेश राज्यपाल सचिवालयाकडून जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र कृषी विद्यापीठे (कृषी विद्यापीठे) अधिनियम, १९८३ मधील सुधारित कलम १७ अंतर्गत ही नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. खर्चे यांचा कार्यकाळ त्यांनी कार्यभार स्वीकारलेल्या तारखेपासून पाच वर्षांचा असणार असून, ६५ वर्षांचे वय पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी येईल त्या कालावधीपर्यंत पदावर कार्य करण्याची तरतूद आहे.
mpkv vc vilas kharche डॉ. खर्चे हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे संशोधन संचालक पदावर कार्यरत होते.
अधिक वाचा: वर्ग-२ प्रकारातील सर्व जमिनींची तपासणी होणार? वर्ग-२ मध्ये नक्की कोणकोणत्या जमिनी येतात?
