Join us
Daily Top 2Weekly Top 5

Harbhara Pest Control : हरभऱ्यावर घाटे अळीचा हल्ला; जाणून घ्या उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 17:16 IST

Harbhara Pest Control : ढगाळ आणि आर्द्र हवामानामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कळी, फुलोरा आणि घाटे अवस्थेत ही कीड पिकाचे सर्वाधिक नुकसान करते. या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना एकात्मिक कीटक व्यवस्थापन पद्धती तातडीने अंगीकारण्याचे आवाहन केले आहे.

Harbhara Pest Control :  ढगाळ आणि आर्द्र हवामानामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कळी, फुलोरा आणि घाटे अवस्थेत ही कीड पिकाचे सर्वाधिक नुकसान करते. (Harbhara Pest Control)

एकच अळी २५ ते ३० घाट्यांना पूर्णतः पोकळ करते, त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना एकात्मिक कीटक व्यवस्थापन पद्धती तातडीने अंगीकारण्याचे आवाहन केले आहे.(Harbhara Pest Control)

हरभरा पिकाला उत्पादनात मोठी घट आणणाऱ्या प्रमुख किडींपैकी 'घाटे अळी' (Helicoverpa armigera) याचा प्रादुर्भाव अलीकडच्या दिवसांत वाढत चालला आहे. (Harbhara Pest Control)

विशेषत: प्रदेशात सुरू असलेल्या ढगाळ, आर्द्र आणि थंड हवामानामुळे या किडीच्या वाढीस अत्यंत पोषक वातावरण तयार झाले आहे. हरभरा पिकावर कळी, फुलोरा आणि घाटे अवस्थेत ही कीड सर्वाधिक नुकसान करते. एकच अळी तिच्या जीवनचक्रात तब्बल २५ ते ३० घाट्यांचे नुकसान करत असल्याने उत्पादनात मोठी घट येते.(Harbhara Pest Control)

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कडधान्य शास्त्र विभागाने शेतकऱ्यांना तत्काळ पिक व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला आहे.

किडीचा प्रादुर्भाव आणि नुकसानाचे स्वरूप

घाटे अळी ही कीड हरभरा, तूर, वाटाणा, मसूर, चवळी यांसारख्या कडधान्यांबरोबरच कापूस, सूर्यफूल, टोमॅटो, कोबी आदी पिकांनाही बाधित करते.

* अंडी खसखशीच्या दाण्यासारखी दिसतात* अळ्या १५–२० दिवसांत वाढतात; लांबी ३०–४० मिमी* पहिल्या अवस्थेत पाने कुरतडणे* पुढील अवस्थेत कळी, फुले आणि दाणे फस्त करणे* घाटे पूर्णतः पोकळ होतात आणि उत्पादन कमी होते

शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांचा मार्गदर्शक सल्ला

किडीने आर्थिक मर्यादा गाठल्यास, रासायनिक कीटकनाशकांचा आलटून-पालटून वापर करणे आवश्यक आहे. परंतु तज्ज्ञांचे मत आहे की, एकात्मिक कीटक व्यवस्थापन (IPM) स्वीकारल्यास हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाचवता येऊ शकते.

डॉ. प्रज्ञा कदम, कडधान्य संशोधन विभाग, पीडीयू कृषी विद्यापीठ, अकोला यांनी खालील उपाययोजना सुचवल्या आहेत

शेतकऱ्यांनी तातडीने अमलात आणाव्यात या उपाययोजना

सांस्कृतिक पद्धती

उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करून अळींची कोषावस्था नष्ट करावी

कमी संवेदनशील वाण वापरावेतजाकी-९२१८, कनक, विजय, दिग्विजय, कांचन

तणे आणि पर्यायी खाद्य वनस्पती पूर्णतः काढून नष्ट कराव्यात

मिश्र पिके

गहू, मोहरी, जवस, कोथिंबीर यांची मिश्र पिके घेतल्यास किडीचा प्रादुर्भाव कमी होतो

यांत्रिक नियंत्रण

अळ्या वेचून नष्ट कराव्यात

पक्षी थांबे उभारून किडीचे नैसर्गिक नियंत्रण करावे

जैविक नियंत्रण

पिकाच्या कळी अवस्थेत प्रति हेक्टर५ ते १० फेरोमोन (कामगंध) सापळे लावावेत

निंबोळी अर्क (५%) किंवाएचएनपीव्ही (Helicoverpa NPV) ची फवारणी करावी

रासायनिक नियंत्रण

वरील उपायानंतरही किडीची पातळी वाढल्यास कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली कीटकनाशके पर्यायाने वापरावीत, जेणेकरून प्रतिकारशक्ती वाढणार नाही.

हरभरा उत्पादनात होणारी सततची घट टाळण्यासाठी घाटे अळीचे व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. वेळेत निरीक्षण, जैविक उपाययोजना आणि शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा योग्य वापर केल्यास पिकाचे मोठे नुकसान टाळता येते. तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सतत शेत निरीक्षण ठेवण्याचे आवाहन केले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Tur Crop Management : ढगाळ हवामानाचा तुरीला फटका; फुलगळ–अळी प्रादुर्भाव वाढला वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Chickpea Pest Control: Manage Pod Borer Attack, Know the Solutions

Web Summary : Cloudy weather increases pod borer attacks on chickpeas. Integrated pest management is crucial. Farmers are advised to adopt methods like deep plowing, mixed cropping, and using biopesticides for effective control and to minimize yield loss.
टॅग्स :शेती क्षेत्रहरभराशेतकरीशेती