इंदापूर : शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार करत, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी ऊस दर जाहीर केला आहे.
यंदा गाळपास येणाऱ्या उसाला प्रतिटन तीन हजार ३३५० रुपयेप्रमाणे ऊसदर देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.
यातील पहिला हप्ता तीन हजार २०० रुपयांचा असणार आहे. उर्वरित १५० रुपयांची रक्कम दिवाळीला शेतकऱ्यांना दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ते म्हणाले की, आज अखेर कारखान्याचे एक लाख ६५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. ऊस उत्पादकांनी सर्व ऊस हा कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.
अधिक वाचा: पंचगंगा शुगर कारखान्याकडून पहिल्या पंधरवड्याचे ऊस बिल जमा; २६५ उसाला कसा दिला दर?
