Join us

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेचे २३.३७ कोटी रुपये वितरित

By मुक्ता सरदेशमुख | Published: February 21, 2024 8:46 AM

राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्व किंवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्याऱ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेचे २३.३७ कोटी रुपये वितरित ...

राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्व किंवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्याऱ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेचे २३.३७ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णयही आला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्त्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून 23.37 कोटी रुपये इतके अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

यासाठी देण्यात येते भरपाई

राज्यात शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो.  काहीना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते.

शेतकरी अपघात विमा योजनेचे पैसे लवकरच वारसदारांना मिळणार, २४५३ शेतकऱ्यांना लाभ

अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस/त्यांच्या कुटुंबास मदत देण्याकरीता कोणतीही स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने ही योजना सुरु केली. “शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना” ही योजना सन २००५-०६ पासून कार्यान्वित केलेली होती. सन २००९-१० पासून सदर योजनेचे नामाभिधान “शेतकरी जनता अपघात विमा योजना” असे करण्यात आले. सन २०१५-१६ पासून सदर योजनेचे नामाभिधान “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना”  Gopinath Munde apghat vima yojanaअसे करण्यात आले.

योजनेचे स्वरुप

शासन निर्णय दिनांक १९ एप्रिल २०२३. सदर योजनेत राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही १ सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा, अविवाहीत मुलगी) यांचा समावेश आहे.

अपघातग्रस्त व्यक्तीची वयोमर्यादा १०  ते ७५  वर्षे.

योजनेतंर्गत देण्यात येणारी मदत अपघाती मृत्यू: रु. २.००  लाखदोन डोळे/दोन अवयव निकामी होणे: रु. २.०० लाख एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे: रु. १.०० लाख

टॅग्स :सरकारी योजनागोपीनाथ मुंडे