Join us

Poultry Business : पोल्ट्री व्यवसाय अधिक फायदेशीर होण्यासाठी काय करायचं, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 16:15 IST

Poultry Business : हा व्यवसाय कमी भांडवलात सुरू करता येतो आणि योग्य व्यवस्थापन केल्यास चांगला नफा मिळतो.

Poultry Business :     पोल्ट्रीव्यवसाय फायदेशीर ठरू शकतो, कारण वाढत्या लोकसंख्येमुळे अंडी आणि मांसाची मागणी सातत्याने वाढत आहे. हा व्यवसाय कमी भांडवलात सुरू करता येतो आणि योग्य व्यवस्थापन केल्यास चांगला नफा मिळतो. हा व्यवसाय अधिक फायदेशीर होण्यासाठी काय करायचं, हे समजून घेऊयात.... 

कुक्कुटपालन फायदेशीर होण्यासाठी महत्वाच्या बाबीवयोगटानुसार कुक्कुटपालनात तीन प्रकारचे व्यवस्थापन आवश्यक आहेलहान पिलांची निगा राखणे (ब्रूडींग) एक दिवसापासून ६ आठवड्यापर्यंतशरीर वाढीसाठी सहा आठवड्यांपासून १८ आठवड्यापर्यंतअंड्यावरील कोंबड्यांचे व्यवस्थापन १९ आठवड्यांच्या पुढे

कोंबड्या अंड्यावर येईपर्यंत वाढविणे व तेथून एक वर्ष अंड्याच्या उत्पन्नाचा काळ अशा पद्धतीने कोंबड्यांचे व्यवस्थापन करावे. व्यवस्थापनाच्या पद्धतीबरोबर कोंबड्यांना योग्य ते संतुलित खाद्य देणे आवश्यक आहे. संतुलित खाद्य, रोगप्रतिबंधक उपाय व शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन या तीन सुत्रांमुळे कुक्कुटपालन व्यवसायाची वाढ झालेली आहे.

पोल्ट्री व्यवसाय फायदेशीर असण्याची कारणे:वाढती मागणी : लोकसंख्येमध्ये वाढ झाल्यामुळे अंडी आणि मांसाच्या मागणीतही वाढ होत आहे, ज्यामुळे पोल्ट्री व्यवसाय फायदेशीर ठरतो.कमी भांडवल : कमी प्रमाणात भांडवल लावूनही हा व्यवसाय सुरू करता येतो. उदा. एका दिवसाची पिल्ले विकत घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.सरकारी योजना : शासनाच्या विविध योजनांचा आधार, पशुवैद्यकीय सुविधांमुळे या व्यवसायाला अधिक मदत मिळते.विविध पर्याय  : तुम्ही अंड्यांसाठी (लेअर) किंवा मांसासाठी (ब्रॉयलर) पोल्ट्री फार्म सुरू करू शकता. उत्पन्नाचे विविध स्रोत : पोल्ट्री फार्ममधून अंडी, मांस आणि खत यांसारख्या अनेक गोष्टी विकून उत्पन्न मिळवता येते. 

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

English
हिंदी सारांश
Web Title : Maximize Poultry Business Profits: Comprehensive Guide to Successful Farming

Web Summary : Poultry farming offers profit due to rising demand. Key is managing chicks by age, balanced feed, and disease prevention. Government schemes and diverse options like eggs or meat boost income from various sources like eggs, meat, and manure.
टॅग्स :पोल्ट्रीव्यवसायशेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरी