Join us

तलावात मासेमारी करताय? उन्हाळ्यात नुकसान टाळण्यासाठी हे कराच..

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 29, 2024 4:47 PM

उष्णतेने तलावातील मासे दगावताहेत. अशावेळी काय करावे?

पाण्याअभावी महाराष्ट्रातील तलावातील पाण्यात वेगाने घट होत आहे. अशावेळी तलावात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. उष्णतेमुळे तलावातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असून मासे दम तोडत आहेत. अशावेळी काय करावे, ज्यामुळे होणारे नुकसान टळेल? जाणून घ्या ..

राज्यात सध्या तापमानाचा पारा चढाच असून ४० अंश सेल्सियसच्या वर तापमान जात आहे. प्रचंड उष्णतेने तलावातील ऑक्सिजनचे प्रमाण घटू लागले आहे. मासे दगावण्याच्या भितीने मच्छीमारांची चिंता वाढली आहे. यासाठी खालील उपाय करता येतील..

चुन्याच्या पाण्याचा शिडकावा

उन्हात तापमान सहन न झाल्याने मासे दगावत असल्याचे दिसून येत आहे. उष्णतेचा फारचा परिणाम माशांवर होऊ नये यासाठी तलावाचे पाणी बदलत रहाणे गरजेचे आहे. तलावातील पाण्याची पातळी ५ फुट ते ५.५० फुट असावी. तलावातील पाणी हिरवे होत असेल तर माशांना जास्त खाद्य देऊ नये. तलावात वारंवार चुन्याच्या पाण्याचा शिडकावा करावा ज्यामुळे त्यात ऑक्सिजनची पातळी स्थिर राहते.

माशांना दुसऱ्या तलावात सोडणे

उष्णतेमुळे मासे दगावत असतील तर त्यांना दुसऱ्या तलावत सोडणे हा चांगला मार्ग समजला जातो. ताज्या पाण्यात या माशांना सोडल्यास उष्णता कमी होऊन माशांचे मरण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

छोट्या तलावात करा मासेपालन

मच्छीपालनाला नव्याने सुरुवात करत असाल तर छोट्या  तलावापासून सुरुवात करण्याची शिफारस तज्ञ देतात. ज्यात माशाची पैदास चांगली होऊन व्यावसायिकांचे नुकसान होणार नाही.

हेही वाचा

सावधान; कासारी नदीमध्ये सापडला हा विदेशी जातीचा मासा

मत्स्य पालनाबाबतची ए टू झेड माहिती एका क्लिकवर, फक्त हे काम करा... 

कटला मासा खवैय्यांमध्ये लोकप्रिय,मच्छीमारांना संगोपनातून करता येणार कमाई...

टॅग्स :मच्छीमारतापमान