todays panchang importance of the day marathi panchang 27 june 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 27 जून 2019
Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 27 जून 2019

आज जन्मलेली मुलं- 
7 क. 43 मि. पर्यंतची मुले मीन राशीत असतील. पुढे मेष राशीत मुले राहतील. रवि-हर्षल शुभयोगामुळ कल्पकता ते कर्तृत्व यामधून स्वत:चा प्रभाव निर्माण करता येईल. अनपेक्षित होणारे बदल उत्साह देत राहतील. त्याचे प्रतिसाद अनेक प्रांतात होतील. संयम आवश्यक. 
जन्माक्षर मीन- द, य
मेष- अ, ल, ई
- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग-
गुरुवार, दि. 27 जून 2019
भारतीय सौर, 6 आषाढ 1941
मिती ज्येष्ठ वद्य नवमी 5 क. 44 मि.
रेवती नक्षत्र 7 क. 43 मि. मीन चंद्र 7 क. 43 मि. 
सूर्योदय 06 क. 5 मि., सूर्यास्त 07 क. 18 मि. 

दिनविशेष-
1839- युद्धशास्त्रातील जाणता शीख महाराजा रणजितसिंग यांचे निधन
1864- साहित्यिक, 'काळ'कर्ते शिवराम महादेव परांजपे यांचा जन्म
1875- प्रसिद्ध कवी दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त यांचा जन्म
1880- अंधत्वावर विजय मिळवणारी जगप्रसिद्ध कर्तृत्वसंपन्न अमेरिकन महिला लेखिका हेलन केलर यांचा जन्म
1939- प्रख्यात संगीत दिग्दर्शक आर. डी. तथा राहुलदेव बर्मन यांचा जन्म
1979- महाराष्ट्र पोलिसांना ट्रेड युनियन स्थापनेस मुभा
1998- माजी मंत्री व सिक्कीमचे माजी राज्यपाल होमी जे. तल्यारखान यांचे निधन
 


Web Title: todays panchang importance of the day marathi panchang 27 june 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.