Today's horoscope - 10 August 2020; Will get beneficial news from wife | आजचे राशीभविष्य - 10 ऑगस्ट 2020; पत्नीकडून लाभदायक वार्ता मिळेल

आजचे राशीभविष्य - 10 ऑगस्ट 2020; पत्नीकडून लाभदायक वार्ता मिळेल

मेष - श्रीगणेशाच्या सांगण्यानुसार आजचा दिवस आनंदोल्हासयुक्त आणि शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला जाईल. प्रत्येक काम यशस्वी होईल.  आणखी वाचा.

वृषभ - आजचा दिवस आपणासाठी शुभ नाही असे श्रीगणेश सांगतात. विविध चिंता सतावतील. तब्बेत साथ देणार नाही. स्नेही आणि नातलग यांच्याशी मतभेद होतील. आणखी वाचा.

मिथुन - आज विविध मार्गांनी लाभ झाल्यामुळे हर्षोल्हास दुप्पट वाढेल असे श्रीगणेश वर्तवितात. पत्नी आणि मुलाकडून लाभदायी वार्ता मिळतील.  आणखी वाचा.

कर्क - श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे. वरिष्ठ अधिकार्यांची कृपामर्जी राहील व आपले वर्चस्व वाढेल.  आणखी वाचा.

सिंह - आज धार्मिक कार्यात वेळ घालवाल आणि स्नेह्यांसोबत एखाद्या धर्मस्थळी जाण्याची सुवर्णसंधी लाभेल. कर्तव्यनिष्ठ राहून हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा प्रयत्न कराल. आणखी वाचा.

कन्या - वाणीवर ताबा ठेवण्याची सूचना देतानाच श्रीगणेश आपणास नव्या कार्याचा आरंभ करू नका आणि आवेश व क्रोध वाढणार नाही याची दक्षता घ्यायला सांगतात. आणखी वाचा.

तूळ - आज आपले मन मित्रांबरोबर खाणे- पिणे, दौरा करणे आणि प्रेमसंबंध यामुळे आनंदी राहील. यात्रा सहलीचे योग आहेत. आणखी वाचा.

वृश्चिक - कौटुंबिक वातावरण आनंद व उत्हासाने पूर्णपणे भरलेले असेल. शरीरात चैतन्य आणि उत्साह संचारेल. प्रतिस्पर्धी तसेच छुपे शत्रू आपल्या प्रयत्नात अयशस्वी होतील. आणखी वाचा.

धनु - आज कार्यपूर्ती न झाल्याने हताश व्हाल, पण निराश होऊ नका असे श्रीगणेश सांगतात. रागावर नियंत्रण ठेवा. संतती विषयक बाबींमुळे चिंता वाढतील. आणखी वाचा.

मकर - आजचा दिवस आपणास अशुभ असून शारीरिक आणि मानसिक दृष्टीने प्रतिकूलता अनुभवाल असे श्रीगणेश सांगतात. घरातील सदस्यांशी कटू प्रसंग घडतील.  आणखी वाचा.

कुंभ - चिंतेची छाया दूर झाल्याने मानसिक स्वास्थ्य मिळेल असे श्रीगणेश सांगतात. मनात उत्साह संचारेल. त्यामुळे पूर्ण दिवस आनंदात जाईल.  आणखी वाचा.

मीन - वाणीवर नियंत्रण ठेवले नाही तर लढाई- संघर्ष होतील असा इशारा श्रीगणेश देत आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.  आणखी वाचा.

Web Title: Today's horoscope - 10 August 2020; Will get beneficial news from wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.