अध्यात्म - विभूतींचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 05:49 AM2019-08-17T05:49:11+5:302019-08-17T05:49:26+5:30

मी कुठल्या कुठल्या विभूतींनी त्रैलोक्याला व्यापले आहे, त्याविषयी तुझ्या शुद्ध मनात जे भावविश्व निर्माण झाले आहे ते तुला थोडक्यात माझ्या मुख्य विभूती कथन करीतच सांगितल्या होत्या

Spirituality - Visions of Vibhuti | अध्यात्म - विभूतींचे दर्शन

अध्यात्म - विभूतींचे दर्शन

googlenewsNext

आपला विभूतीयोग भक्तश्रेष्ठ अर्जुनाला सांगताना भगवंत मोठ्या पे्रमाने म्हणाले की,
अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन।
विष्टभ्याहमिदं कृत्स्त्रमेकांशन स्थितो जगत।।
पार्था, मी कुठल्या कुठल्या विभूतींनी त्रैलोक्याला व्यापले आहे, त्याविषयी तुझ्या शुद्ध मनात जे भावविश्व निर्माण झाले आहे ते तुला थोडक्यात माझ्या मुख्य विभूती कथन करीतच सांगितल्या होत्या. तरीही आता साररूपात कथन करतो ते श्रद्धापूर्वक श्रवण कर, माझ्या सर्व विभूती जाणून घेण्याची आवश्यकता नाही. मी माझ्या केवळ एका अंशानेच संपूर्ण ब्रह्मांड व्यापलेले आहे. एवढेच फक्त ध्यानात ठेव. तू फक्त मलाच जाणून घे. तेवढेच पुरेसे होईल. भगवंतांना भक्तश्रेष्ठ अर्जुनाने विनंती केली की, भगवंता, केवळ एका अंशाने हे ब्रह्मांड व्यापलेले आहे. आपल्या असंख्य विभूती आहेत. माझ्या मर्त्य नजरेने मला या तुमच्या सर्व दिव्य विभूती, तुमची परमकृपा झाल्याशिवाय कधीच पाहता येणार नाहीत. माझी योग्यता असेल तर, आपण मला आपल्या सर्व विभूतींचे दर्शन घडवाल का? अर्जुनाची विश्वरूप पाहण्याची इच्छा ऐकून भगवंत मनोमनी सुखावले आणि त्यांनी आपल्या या परमभक्ताला आपले विश्वरूप दाखवण्याचे निश्चित केले. भगवंत म्हणाले,
पश्य मे पार्था रूपाणि शतशो थ सहस्त्रश:।
नानााविधानि दिव्यानि नानावर्णाकतीनि च
पार्था, माझे ब्रह्मांड भव्य स्वरूप एकदाच फक्त माता यशोदेला गोकुळात असताना बालपणी दाखवले होते हे सत्य आहे. त्यानंतर आजपर्यंत दडवून ठेवलेले हे अतिभव्य स्वरूप मी फक्त तुलाच दाखवणार आहे. हजारो ऋषीमुनींनी कठोर तपश्चर्या करून, हे माझे दिव्य स्वरूप पाहण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु तू माझा परमभक्त आहेस, म्हणून तुझी ही विश्वरूप पाहण्याची इच्छा मी या भाग्यक्षणी पूर्ण करणार आहे.

Web Title: Spirituality - Visions of Vibhuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.