Shravan Special : रामेश्वर, औंढा नागनाथ आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 03:10 PM2018-09-03T15:10:06+5:302018-09-03T15:18:00+5:30

Shravan Special : आज श्रावणाचा चौथा आणि शेवटचा सोमवार. अनेक भाविकांनी शंकराची पूजा करण्यासाठी देशभरातील मंदिरांमध्ये गर्दी केली असेल.

shravan special importance of Rameshwar Aundha Nagnath and Grishneshwar jyotirling | Shravan Special : रामेश्वर, औंढा नागनाथ आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं महत्त्व!

Shravan Special : रामेश्वर, औंढा नागनाथ आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं महत्त्व!

Shravan Special : आज श्रावणाचा चौथा आणि शेवटचा सोमवार. अनेक भाविकांनी शंकराची पूजा करण्यासाठी देशभरातील मंदिरांमध्ये गर्दी केली असेल. आज आपण शेवटच्या तीन ज्योतिर्लिंगाचं महत्त्व आणि त्यांची माहिती जाणून घेणार आहोत. 

1. रामेश्वर

रामेश्वर दक्षिण भारतात प्रसिद्धच आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळे या मंदिलाराला रामेश्वर असे नाव पडले. स्कंद पुराण व शिव पुराणांमध्ये या पवित्र क्षेत्राचा उल्लेख आलेला आहे. रामेश्वर द्वीपाचा आकार काहीसा श्रीविष्णूच्या शंखासारखा असून श्रीलंकेच्या राजाने याठिकाणी मंदिर बांधले होते. रामेश्वर मंदिराची निर्मिती १२ ते १६व्या शतकात झाली. इ.स. १८९७ मध्ये स्वामी विवेकानंद येथे दर्शनासाठी येऊन गेले आहेत.

रामोश्वर हे बंगालचा उपसागर व हिंदी महासागर यांचे संगम स्थान असून द्रविड स्थापत्य शैलीचे हे मंदिर मानले जाते. येथील मंडपाची निर्मिती इ.स. १७४० ते १७७० या कालावधीत झाली. या मंदिर परिसरात २२ विहिरी असून गर्भगृहात चांदीच्या चौथऱ्यावर सुंदर शिवलिंग आहे.

विशेष म्हणजे या शिविलगावर केवळ गंगाजलाचाच अभिषेक केला जातो. महाशिवरात्रीस मुख्य उत्सव होतो. हत्तीवरून रामेश्वराच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येते. दीपोत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी तामिळ भाविक मोठया प्रमाणावर यात्रेसाठी येत असतात. 

2. औंढा नागनाथ

औंढा नागनाथ पांडवांतील धर्मराजाने हे मंदिर बांधले असून महाराष्ट्रातील संत नामदेव  आणि त्यांचे गुरु विसोबा खेचर यांची प्रथम भेट याच मंदिरात झाली.  यांनतर  अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोधार केला.     
                                       
या मंदिरात २५ फुट उंचीची तटबंदी असून  चारही दिशांना चार दरवाजे आहेत. मंदिराचा खलाचा भाग काळ्या पाषाणात व वरील  अर्धा भाग पांढऱ्या विंटापासून तयार करण्यात आलेला असल्याने मंदिर खुलून दिसते. महाद्वारावर शिवलीलेचे प्रसंग आहेत. यात नटराज मूर्ती, शंकर पार्वतीस काही तरी समजावून सांगत असल्याचे विलाभोनीय दृश बघावयास मिळते. 

महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव होतो तसेच येथे होणारा रथौत्सव पाहण्यासाठी लांबून भाविक या ठिकामाला भेट देतात. रथाच्या ५ फेऱ्या मंदिराभावती मारल्या जातात. असं म्हटलं जातं कि, काशीची गंगा येथे प्रकट होते व कुंडाचे पाणी स्वच्छ करून टाकते. विजयादशमीच्या दिवशी नागनाथ महाराजांची पालखी निघते. 

3. घृष्णेश्वर

स्कन्दपुराण व शिवपूराण, रामायण व महाभारत यांसारख्या पवित्र ग्रथांमध्ये श्री घष्‍णेश्‍वराचा उल्‍लेख करण्यात आलेला आहे. सुमारे 1500 वर्षापासून राष्‍ट्रकुट घराण्‍यातील राजा कृष्‍णराजने हे मंदिर बांधले आहे. इ.स 1730 मध्‍ये गौतमीबाई महादेव होळकर यांनी मंदिराचा जिर्णोध्‍दार केला.

मंदिराचे मुळ नाव कुंकूमेश्‍वर होते. हे मंदिर शिल्‍पकलेचा उत्‍तम नमुना होय. मुळ दगडी चौथरा सहा हजार आठशे चार चौरस फुट असून अर्धे मंदिर हे लाल पाषाणाचे आहे. मंदिरात सुंदर नंदीची मूर्ती असून खांबावर रामायण व महाभारत, दशावतार आदींचे चत्र रेखाटलेली आहेत. इ.स 1791 मध्‍ये अहिल्‍याबाई होळकरांनी एक एकर बागेत शिवालय तिर्थ बांधले.

महाशिवरात्रीची मोठा यात्रोत्‍सव भरविला जातो.शंकराची पालखी शिवालय तिर्थावर स्‍नानासाठी आणली जाते. रात्रीच्‍यावेळी अंलकार पूजेचा सोहळा होतो. श्रावण सोमवारी मोठया प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येथे येतात.

Web Title: shravan special importance of Rameshwar Aundha Nagnath and Grishneshwar jyotirling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.