भीती : सकारात्मक आणि नकारात्मक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 07:54 PM2020-02-29T19:54:54+5:302020-03-01T15:49:49+5:30

एकटेपणाच्या भीतीने माणसं लग्न करतात, आणि सेटल होतात,…गरीबीच्या भीतीमुळे, माणसांची करीअर घडतात.नोकरी जाण्याच्या भीतीने कर्मचारी ओव्हरटाईम करतात.हारण्याच्या भीतीने खेळाडु, दिवसरात्र प्रॅक्टीस करतात.

psychological stage of Fear | भीती : सकारात्मक आणि नकारात्मक

भीती : सकारात्मक आणि नकारात्मक

googlenewsNext

-डॉ  दत्ता कोहिनकर 

प्रत्येक माणसाला रोजच कशाची ना कशाची भीती वाटते. कधी काम नीट होईल की नाही ही भीती, कधी केलेल्या कामाचं चीज होईल की नाही ही भीती, कधी माझं भविष्य कसं असेल ही भीती.कुणाला शिक्षणाची भीती, कुणाला माझं प्रेम मला मिळेल का ही भीती… कुणाला लग्न न जमण्याची भीती, लग्न जमलेल्यांना/झालेल्यांना आयुष्य सुरळीत पार पडेल का असली भीती,कुणाला मुलं होण्याची भीती, कुणाला झालेली मुलं कशी निघतील याची भीती, कधी नवीन घर, बंगला मिळेल का नाही याची भीती तर, कुणाला माझ्या प्रिय व्यक्तीला काही बरवाईट झालं तर, असली विचित्र भीती. स्वतःला लहान, असहाय, हतबल समजालत तर भीतीचा बागुलबुवा तुमच्यावर चाल करुन आलाच समजा. माणसाच्या मनात २४ तासात ६०००० साठ हजार विचार येतात त्यापैकी ७० टक्के विचार भयावह व नकारात्मक असतात . त्याचा सामना करणे आवश्यक असते .

ज्या गोष्टीची तुम्हाला भिती वाटते तेवढी ती भयावह नसते . भयग्रस्त मन भयाचा राक्षस उभा करत . त्याला धैर्याने तोडं द्या.  व.पु. काळे एकेठिकाणी म्हणतात, “वार झेलायला उभं राहीलं, की मारणार्‍याचं बळ जातं”. आणि  गब्बरबाबा शोले प्रवचनात सांगुन गेलेत, “जो डर गया, वो मर गया”भीतीला अनुभवा, सोबत आपलं घोडं पुढं दामटत रहा, विजय तुमचाच आहे.जे लोक आपल्या आयुष्यातुन भीतीची विषारी मुळे उखडुन फेकण्यात यशस्वी ठरले, तेच असामान्य झाले.ह्यासाठी काही उपाय –भितीचा मजाक उडवा कुटुंबातील किंवा मित्रातील व्यक्ती निगेटीव्ह बोलु लागल्या की त्यांना टाळा, चुप बसा, किंवा तिथुन निघुन जा. अजुन वाईट झालं असतं, पण देवाने आपल्यावर कृपा केली हे विसरु नका. समस्येला वाढवुन चढवुन बघु नका, आजुबाजुला तुमच्यापेक्षाही बेकार परीस्थीतीत माणसं आनंदाने जगत आहेत.

ध्येय पुर्ण झालयं असं मनाला पटवुन द्या, आनंदाचा झरा तुडूंब वाहु लागेल. भीती केवळ एक ‘विचार’ आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जसं, ‘असं घडलं तर… कधी असं घडू नये… मी मरणार तर नाही ना… मी इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालो नाही तर… पेपर लिहिताना मला उत्तर आठवलं नाही तर…’ बस्स, अशा एका भीतिदायक विचाराने मनुष्य मनात एक चित्र तयार करतो, ज्यात तो एक विचार दृश्यरूप घेताना पाहतो आणि त्यानुसार त्याच्या जीवनात तशाच घटना आकर्षित करतो. आतापर्यंत आपण पाहिलं की भीतीचा बागुलबुवा कसा आपल्याला घेरतो आणि त्यापासून दूर राहण्यासाठी आपल्याला काय करता येईल…नाण्याच्या नेहेमी दोन बाजु असतात, तसेच प्रत्येक गोष्टीचे दोन प्रकार असतात, चांगली आणि वाईट…भीतीचे जसे काही तोटे आहेत, तसे भीतीचे काही फायदेही आहेत. मी जर असं म्हंटल की भीती सुद्धा प्रेरणादायी असते, तर तुम्हाला धक्काच बसेल…

पण बघा ना!…..नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थी अभ्यास करतो.गरीब होण्याच्या भीतीने माणुस, आळशीपणा झटकुन कामाला जातो.. भीती वाटतेय, याचा अर्थ तुम्ही समस्यांकडे लक्ष देताय….भीती एक हातात छडी घेतलेल्या शिक्षकाचं काम करतेय….भीती आपल्याला खुप कष्ट करण्यासाठी मिळणारं इंधन असतं. .एकटेपणाच्या भीतीने माणसं लग्न करतात, आणि सेटल होतात,…गरीबीच्या भीतीमुळे, माणसांची करीअर घडतात.नोकरी जाण्याच्या भीतीने कर्मचारी ओव्हरटाईम करतात.हारण्याच्या भीतीने खेळाडु, दिवसरात्र प्रॅक्टीस करतात.

बदनामीची भीती असणारी माणसं, सज्जनपणे वागतात.ज्यांना मरणाची भीती असते ते, आयुष्य सत्कारणी लावतात.भीतीचा वापर दुबळं होण्यासाठी करायचा का जागं होण्यासाठी ?…ते आपल्या हातात असतं..म्हणुन म्हणतो, कधीकधी आयुष्यात भिणं पण चांगलं असतं…तुम्ही कितीही संकटात असा….दुःखात असा…. आयुष्यातल्या विविध समस्यांनी त्रस्त असा.पण एखाद्या, आपल्या माणसाला, दुःखात पाहुन इतकं नक्कीच म्हणा, “मी आहे ना!…”हे तीन शब्द जगण्याचं नव बळ देतील…..यापासून दूर राहण्यासाठी मन सबल करा त्यासाठी विपश्यना ध्यान शिबिर हा सर्वोत्तम मार्ग आहे . हे पूर्णतः विनामूल्य असते .

Web Title: psychological stage of Fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.