Mahashivratri : या महाशिवरात्रीला तब्बल ५९ वर्षांनी जुळून येतोय 'हा' महायोग, भक्तांना मिळणार लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 09:55 AM2020-02-20T09:55:39+5:302020-02-20T10:01:28+5:30

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते.

Mahashivratri : Special Yog will be done after 59 years on Mahashivaratri | Mahashivratri : या महाशिवरात्रीला तब्बल ५९ वर्षांनी जुळून येतोय 'हा' महायोग, भक्तांना मिळणार लाभ!

Mahashivratri : या महाशिवरात्रीला तब्बल ५९ वर्षांनी जुळून येतोय 'हा' महायोग, भक्तांना मिळणार लाभ!

googlenewsNext

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. यंदा २१ फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे.

५९ वर्षांनी आला आला योग

यावर्षीच्या महाशिवरात्रीला एक महायोग होत आहे. शश योग हा तब्बल ५९ येणार आहे. ज्योतिषांनुसार, या दिवशी शनि आणि चंद्र मकर राशी, गुरू धनु राशीत, बुध कुंभ राशीत आणि शुक्र मीन राशीत राहतील. हा योग साधना आणि सिद्धीसाठी खास मानला जातो. या दिवशी मनोभावे पूज केल्याने आणि दान केल्याने लाभ मिळतो अशी मान्यता आहे.

काय आहे महत्व?

अशी मान्यता आहे की,  काही दंतकथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय. तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीच विवाह झाला होता. महाशिवरात्री विषयी आणखी कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला ‘जलरात्री’ देखील संबोधतात. महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती.

कशी केली जाते पूजा?

(Image Credit : patrika.com)

महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे.

महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. या दिनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत दीड दिवसाचे असते. त्यामुळे त्याचा दुसर्‍या दिवशी सकाळी समाप्त होतो. दुसर्‍या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशिर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात.

 

Web Title: Mahashivratri : Special Yog will be done after 59 years on Mahashivaratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.