Dhanteras 2020: धनत्रयोदशीला 'हा' आहे सोने खरेदीचा अन् पूजेचा मुहूर्त; जाणून घ्या धनाची पूजा करण्यामागचं कारण

By Manali.bagul | Published: November 12, 2020 03:31 PM2020-11-12T15:31:28+5:302020-11-12T15:41:12+5:30

Diwali Dhanteras 2020 : धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. सोन्याच्या वस्तू, उपकरणं, दागिने खरेदीसाठी हा शुभमुहूर्त मानला जातो. देवांचा खजिनदार कुबेराचीही पूजा या पवित्र दिवशी केली जाते.

Dhanteras 2020 : know what is the auspicious time to buy gold tomorrow | Dhanteras 2020: धनत्रयोदशीला 'हा' आहे सोने खरेदीचा अन् पूजेचा मुहूर्त; जाणून घ्या धनाची पूजा करण्यामागचं कारण

Dhanteras 2020: धनत्रयोदशीला 'हा' आहे सोने खरेदीचा अन् पूजेचा मुहूर्त; जाणून घ्या धनाची पूजा करण्यामागचं कारण

googlenewsNext

१३ नोव्हेंबरला म्हणजेच शुक्रवारी धनत्रयोदशी (Dhantrayodashi 2020) साजरी करण्यात येणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी धनाची पूजा केली जाते. धणे व गूळ यांचा नैवेद्य दाखविला जातो.  दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहक तयारीत असतील. कोरोनाच्या सावटामुळे यंदा उत्साह कमी असला तरीही या दिवसाचं महत्व लक्षात घेता ऑनलाईन किंवा इतर माध्यमातून लोक कार, दुचाकी किंवा सोनं विकत घेतले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. सोन्याच्या वस्तू, उपकरणं, दागिने खरेदीसाठी हा शुभमुहूर्त मानला जातो. देवांचा खजिनदार कुबेराचीही पूजा या पवित्र दिवशी केली जाते.

सोनं खरेदी कराण्याचा आणि पूजेचा शुभमूहूर्त

धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करायचं असल्यास सकाळी ६ वाजून ४२ मिनिटांपासून ते संध्याकाळी ५ वाजून ५९ मिनिटांपर्यंत ते खरेदी करावं. हा काळ हिंदू पंचांगानुसार सोनेखरेदीसाठी शुभ मुहूर्त आहे. कोरोना महामारीमुळे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा शक्य असल्यास ऑनलाईन खरेदी करा. हिंदू पंचांगानुसार १३ नोव्हेंबर २० शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजून २८ मिनिटांपासून ५ वाजून ५९ मिनिटांपर्यत धनत्रयोदशीची पूजा करण्याचा उत्तम मुहूर्त आहे.

अशी आहे लोक लोककथा?

शेकडो वर्षांपूर्वी हिम नावाचा राजा होता. लग्नाच्या चौथ्या दिवशी त्याच्या मुलाचा मृत्यू होईल अशी भविष्यवाणी एका ज्योतिषाने केली होती. पण हिम राजाच्या सुनेला ही भविष्यवाणी मान्य नव्हती. त्यामुळे तिने पतीचा जीव वाचवण्यासाठी घराच्या दारात भरपूर दिवे लावले. सोन्याच्या दागिन्यांच्या आणि चांदीच्या नाण्यांच्या राशी रचून ठेवल्या.

Govatsa Dwadashi 2020: घरात गाय किंवा वासरू नसताना आज कशी साजरी कराल वसु बारस?; वाचा फक्त एका क्लिकवर

मृत्युची देवता यमराजांना घरात येण्यापासून रोखण्यासाठी हिमराजाच्या सुनेने असी क्लुप्ती केली. सोनं, चांदी आणि दिव्यांतून येणाऱ्या प्रचंड प्रकाशामुळे यमराजाचे डोळे दिपले आणि त्याने राजाच्या मुलाचे प्राण घेतले नाहीत. हे घडलं तो दिवस होता धनत्रयोदशीचा. म्हणूनच लोक धनत्रयोदशीला सोनं आणि चांदी विकत घेतात. जेणेकरून नकारात्मक उर्जा आणि वाईट वृत्ती आणि विचार घरापासून दूर राहतात आणि घरात समृद्धी येते असं मानलं जातं. 

Diwali 2020 : दिवाळीला कमी खर्चात स्मार्ट खरेदी करण्यासाठी 'या' टिप्स नक्की ठरतील उपयोगी

Web Title: Dhanteras 2020 : know what is the auspicious time to buy gold tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.