Anityabodh is need to be conscious | अनित्यबोध जागरूक हवा

अनित्यबोध जागरूक हवा

- फरेदुन भुजवाला
मानसिक, वाचिक वा शारीरिक आपण जे काही कर्म करतो ते स्वत:चा एक संस्कार बनविते़ ते प्रत्येकाच्या खात्यात जमा-खर्चाच्या रूपाने जोडले जातात़ याप्रकारे प्रत्येकाच्या खात्यात चांगले वा वाईट संस्कार जमा होत राहतात़ त्यामुळे जीवनधारा चालत राहते़ जीवन चालत राहील तेव्हा निश्चित रूपाने दु:ख व अंती मृत्यू येतोच़ या संस्कारापासून मुक्ती तेव्हाच मिळू शकते, जेव्हा कोणी अनित्य, दु:ख व अनात्मता योग्यप्रकारे समजेल़ याच, तिन्हींना योग्यप्रकारे समजूनच संस्कारापासून मुक्त होता येऊ शकते़ विपश्यना अभ्यासात प्रगतीसाठी प्रत्येकवेळी, जिथंपर्यंत शक्य असेल तिथंपर्यंत अनित्यतेला सतत जाणत राहिले पाहिजे़

भगवान बुद्ध यांनी भिक्षुंना सांगितले आहे की, सर्ववेळी जरी ते बसले असतील, उभे असतील, चालत असतील अथवा झोपले असतील,
तरीही अनित्य, दु:ख व अनात्मची जाणीव ठेवली पाहिजे, म्हणजे त्याची स्मृती कायम असली पाहिजे़ जर आपण प्रत्येक क्षणी जाणत राहाल की, सर्व संस्कार अनित्य आहेत, तर निश्चितच एकवेळ येईल जेव्हा लक्ष्याची प्राप्ती होईल, असे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांचे गुरू विपश्यनाचार्य सयाजी उ. बा. खिन यांनी प्रवचनात सांगितले आहे़ ते म्हणतात, अनित्येतचा खरा अर्थ आहे, जे नित्य नाही़ जे शाश्वत नाही़ म्हणजे, हे जाणणे की जगात जितक्या वस्तू आहेत, सजीव अथवा निर्जीव, त्या स्थायी नाहीत, नित्य नाहीत, अर्थात सतत परिवर्तनशील आहेत़ भगवान बुद्ध यांनी ४५ वर्षे जो विपश्यना अभ्यास शिकविला त्याचे सार हेच आहे़ युवराज सिद्धार्थ गौतम यांनी सहा वर्षे अथक प्रयत्न
करून विपश्यना विद्या शोधून काढली़ ही विद्या
त्यांनी स्वत:पुरती मर्यादित न ठेवता सर्वांना दिली़ ही विद्या देताना त्यांनी स्त्री, पुरूष, गरीब, श्रीमंत,
असा कोणताही भेद केला नाही, असे विपश्यनाचार्य सयाजी उ. बा. खिन यांनी वेळोवेळी आपल्या प्रवचनात सांगितले आहे़

Web Title: Anityabodh is need to be conscious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.