आनंद तरंग: मनाची कोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 01:21 AM2020-05-04T01:21:05+5:302020-05-04T01:21:25+5:30

आयुष्यातला महत्त्वाचा काळ त्यात नष्ट होतो. सत्य व कठोर कर्मनिष्ठा यातून मिळविलेले सुख त्यावर ईश्वरीशक्तीची मोहोर उमटली असते.

Anand Tarang: Puzzle of the mind | आनंद तरंग: मनाची कोडी

आनंद तरंग: मनाची कोडी

Next

विजयराज बोधनकर

राहुल आणि अरविंद दोघे एकाच शाळेत शिकले. राहुल जागृत होता. तो नेहमी म्हणायचा, वर्तमानाच्या तळहातावर जगण्यासाठी मोहाला व अनाठायी ईर्ष्येला मुठीत ठेवणे गरजेचे असते. कारण प्रत्येकाचं मन काचेसारखं असतं. आपल्यासोबत ज्यांनी इतरांची मने सांभाळलीत, ती मने आपोआप समृद्ध होत जातात, पण अरविंद हा भूतकाळाच्या मोहात अडकलेला एक दुर्दैवी जीव होता. बऱ्याचदा भूतकाळ हा पोकळ गोष्टीसाठी झुरवतो, ठगवतो, हे त्याला समजत नव्हते, त्यामुळे तो प्रगतीच्या मार्गापर्यंत पोहोचू शकत नव्हता. राहुल नेहमी अरविंदला सांगायचासुद्धा की, जो सतत वर्तमानाच्या दिशेने चालत राहतो, तो मागे वळून कधीच पाहात नाही. कारण मागे असतात फक्त भाविनक खड्डे. फक्त भावनेपोटी बुद्धीची भेट झाली नाही तर वर्तमानाच्या स्वागतासाठी ऊर्जा निर्माण तरी कशी होणार? धनापेक्षा मनाची कोडी जो सोडवतो तो कुठल्याही सर्वोच्च पदापर्यंतसुद्धा पोहोचू शकतो आणि बुद्धीचा उपयोग जर शिवरायांच्या पावलांनी केला, तर रावणाला संपविणारा मोह चटणीलासुद्धा उरणारा नसतो. निसर्ग हा सतत शिकवत असतो, पण त्याच्या शाळेकडे बोटावर मोजावी इतकीच माणसे लक्ष देऊन शिकत असतात. सहजसुख सर्वांनाच हवं असतं. त्यासाठी दुबळी माणसं खूप नानातºहेचे कल्पनेतील किंवा खोटे मार्ग शोधतात. शॉर्टकटने आलेलं सुख त्याच मार्गानं निघून जातं. आयुष्यातला महत्त्वाचा काळ त्यात नष्ट होतो. सत्य व कठोर कर्मनिष्ठा यातून मिळविलेले सुख त्यावर ईश्वरीशक्तीची मोहोर उमटली असते. तीच प्रामाणिक कमाई आयुष्याला श्रीमंत करून जाते. जग त्याच्यासोबत असतं. निसर्गनियमांचे पालन करून जो सातत्याने कर्म करतो तोच अनेक निरर्थक मोहाचे पिंडदान करू शकतो व मोहातून सुटका करून घेतो. याचमुळे आंतरिक कौशल्य बाहेर येत असेल तर विजयाचा आलेख वरती नेताना कोण थांबवू शकतो?

Web Title: Anand Tarang: Puzzle of the mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.