Adhyatmik : मना घडवी संस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 06:27 AM2020-01-21T06:27:37+5:302020-01-21T06:27:48+5:30

आईवडील हेच आपले खरे देव. कारण देतो तो देव हे त्यामागचं अगदी साधं आणि सोपं गणित आहे. जसं आपले आईवडील आपले देव आहेत तसंच आणखी कोण कोण आपले देव हे आपण या लेखात पाहणार आहोत.

Adhyatmik: Mana Ghadavi Sanskar | Adhyatmik : मना घडवी संस्कार

Adhyatmik : मना घडवी संस्कार

Next

- प्रल्हाद पै

आईवडील हेच आपले खरे देव. कारण देतो तो देव हे त्यामागचं अगदी साधं आणि सोपं गणित आहे. जसं आपले आईवडील आपले देव आहेत तसंच आणखी कोण कोण आपले देव हे आपण या लेखात पाहणार आहोत. आईवडिलांप्रमाणेच आपल्या आयुष्यात आपल्याला ज्ञान देऊन समृद्ध करणारे आपले शिक्षक अथवा तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर तुमचे टीचरदेखील तुमचे खरे देव आहेत बरं का. कारण आज तुम्ही जे काही आहात ते तुमच्या या टीचरमुळेच. मग तुम्हाला अगदी एबीसीडी शिकवणाऱ्या तुमच्या टीचरपासून ते अगदी तुम्ही लहानाचे मोठे झाल्यावर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला सगळं काही मार्गदर्शन करणारे सारे टीचर्स तुमचे देव आहेत. म्हणूनच दररोज तुमच्या शिक्षकांना मनातल्या मनात थँक्स म्हणायला मुळीच विसरू नका. मग करणार ना तुमच्या सर्व टीचर्ससाठी कृतज्ञता व्यक्त? ज्ञान देऊन तुम्हाला समृद्ध करणाºया टीचरप्रमाणे आणखी एक तुमच्या आयुष्यातील खरा देव तुम्हाला माहीत आहे का? बघा बरं. तुम्ही कुठे राहता, तुमची ओळख नेमकी कोणामुळे आहे. तुम्ही ज्या राष्ट्रात राहता ते राष्ट्र तुम्हाला नागरिकत्व देतं. तुम्ही ज्या राष्ट्रात जन्माला येता त्या राष्ट्रावरून तुमची ओळख ठरते. म्हणूनच आपला भारत देश हा तुमचा देव आहे. राष्ट्र हा जर देव असेल तर या राष्ट्राची भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं? तुम्ही सर्व मुलं भारतीय आहात, कारण तुम्ही भारतात जन्माला आला आहात. राष्ट्राची प्रगती तेव्हाच होते जेव्हा त्या राष्ट्रात राहणारी माणसं प्रगतीपथावर जातात. तुम्ही विद्यार्थी आपल्या भारताचे उद्याचे नागरिक आहात. म्हणूनच आपल्या भारताविषयी आपल्या मनात सतत कृतज्ञ असायला हवं. शिवाय एक उत्तम नागरिक म्हणून तुमच्या कर्तव्यांबाबत नेहमी जागरूक असायला हवं. तुमची राष्ट्राबाबत कोणती कर्तव्यं तुम्ही पाळायला हवीत, हे आपण पुढील लेखात पाहूया.

Web Title: Adhyatmik: Mana Ghadavi Sanskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.