यवतमाळमध्ये रॅगिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 05:11 AM2017-08-19T05:11:08+5:302017-08-19T05:11:12+5:30

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला आहे.

Yavatmal ragging! | यवतमाळमध्ये रॅगिंग!

यवतमाळमध्ये रॅगिंग!

Next

यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याला वरिष्ठ विद्यार्थ्यांनी पाच दिवस मारहाण केली. या विद्यार्थ्याने आपली सुटका करून घेत घर गाठले. त्यानंतर शुक्रवारी पालकासह तक्रार देण्यास आलो असता महाविद्यालय प्रशासनाने दखल घेतली नाही, असा दावा त्याने केला आहे.
अभिषेक असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने ८ आॅगस्टला मेडिकलच्या वसतिगृहात प्रवेश घेतला. पहिल्या दिवसापासून वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून त्याला त्रास दिला जात होता. १२ आॅगस्टला मनीष वासेकर, प्रतीक चव्हाण, बालाजी श्रीरामे, प्रशांत तुरपटवार, शंतनू ढोकणे, मिलिंद गरपिंडे या सहा जणांनी तब्बल त्याला सहा तास गुडघ्यावर बसायला भाग पाडले. नंतर त्यापैकी तिघांनी त्याला १३ आॅगस्टच्या दुपारी वसतिगृहाच्या रुम नं. २५ मध्ये बोलावून पुन्हा मारहाण केली. यामुळे घाबरलेल्या अभिषेकने कशीबशी सुटका करून घेत चंद्रपूर जिल्ह्यातील गाव गाठले.
पाच दिवसानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यावर अभिषेक आई-वडिलांना घेऊन महाविद्यालयात आला. अधिष्ठाता डॉ.अशोक राठोड यांना लेखी तक्रार दिली. मात्र राठोड यांनी दखल न घेता ‘नंतर भेटा’, असे सांगितल्याचे अभिषेकच्या पालकांनी सांगितले. अधिष्ठाता डॉ.राठोड यांच्याशी संपर्क साधला असता ते जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Yavatmal ragging!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.