लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईच्यावतीने घेण्यात आलेल्या गायन परीक्षेत यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
प्रारंभिक गायनमधून पायल सुरेश मेश्राम, ओजस्वी गुल्हाने, राज निचड हे विशेष योग्यतेसह उत्तीर्ण झाले. मैत्री लोहवे, राधिका काशीद, तनय पारटकर या विद्यार्थ्यांनी प्रवेशिका प्रथममध्ये विशेष योग्यतेसह यश मिळविले. अन्वी कुमरे, प्रियेश काटकर, हर्ष वातीले यांनी प्रथम श्रेणी मिळविली. सम्यक पिसे हा प्रवेशिका पूर्णमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला.
यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये प्रमाणपत्र व मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना संगीत शिक्षिका विद्या वावरकर यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास यांनी कौतुक केले.