धनकेश्वर येथे कुस्त्यांची दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 10:17 PM2018-02-17T22:17:35+5:302018-02-17T22:18:27+5:30

येथील धनकेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त कुस्त्यांची दंगल पार पडली. यात विदर्भ केसरी मंगेश करण यांनी दिल्लीचा पहेलवान विशालकुमार यास चित करून विजेतेपद पटकाविले.

The wretched wounds at Dhankeshwar | धनकेश्वर येथे कुस्त्यांची दंगल

धनकेश्वर येथे कुस्त्यांची दंगल

Next
ठळक मुद्देमंगेश करणची बाजी : दीड लाखांची लूट, दिल्ली, नांदेडचे पहेलवान

ऑनलाईन लोकमत
पुसद : येथील धनकेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त कुस्त्यांची दंगल पार पडली. यात विदर्भ केसरी मंगेश करण यांनी दिल्लीचा पहेलवान विशालकुमार यास चित करून विजेतेपद पटकाविले.
कुस्ती दंगलीस पुनरुज्जीवत करण्याचे काम श्रीरामपूरचे अध्यक्ष राजू डहाके, उपाध्यक्ष प्रमोद कदम, विजय भेलके, सचिव अ‍ॅड.कैलास राठोड, गणेश धर्माळे, हरगोविंद कदम, हेमंत मेश्राम, मिलिंद उदेपूरकर, पहेलवान ज्ञानेश्वर बेले, लक्ष्मण राठोड, ज्ञानेश्वर घाटे यांनी केले. धनकेश्वर मंदिर परिसरात कुस्त्यांची दंगल झाली. त्यात विदर्भ केसरी मंगेश करण यांनी २१ हजारांचे प्रथम पारितोषिक पटकावले. १५ हजार रुपयांच्या दुसऱ्या कुस्तीत नांदेडच्या योगेश मुंडकरने दिल्लीच्या कुलदीपसिंगसोबत बरोबरी साधली. तिसरी कुस्ती दिगांबर हिंगोली व इंदोरच्या कमलजीतमध्ये झाली. यात दिगांबर पहेलवानने बाजी मारली. चौथ्या क्रमांकाचे बक्षीस जितू पहेलवान दिल्ली यांनी रामदास पहेलवान यांना हरवून पटकाविले. पाचव्या क्रमांकाचे बक्षीस नारायणसिंग पहेलवान, सहावा क्रमांक राहूल सहारे पहेलवान, सातवा दत्ता बेरगड, आठवा प्रकाश पहेलवान, नववा विकास शिंदे, दहावा गोलू मुळे, अकरावा क्रमांक डुबा पहेलवान यांनी पटकाविला.
उद्घाटनाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड.निलय नाईक, शरद मैंद, एसडीपीओ अजयकुमार बन्सल, ठाणेदार अनिलसिंह गौतम, प्रकाश शेळके, अ‍ॅड.भारत जाधव, काळू पहेलवान, नगरसेवक निळकंठ पाटील, लक्ष्मण वाघमोडे पहेलवान आदी उपस्थित होते. बक्षीस वितरणाला अ‍ॅड.आप्पाराव मैंद, सतीश बयास, लक्ष्मणदादा जाधव पहेलवान, डॉ.वजाहत मिर्झा, शिवाजी सवनेकर, अ‍ॅड.आशीष देशमुख, ज्ञानेश्वर तडसे, अ‍ॅड.रमेश पाटील आदी उपस्थित होते. युवा दुर्गोत्सव मंडळ, शिव गर्जना गणेश मंडळ, चिंतामणी सेवा मंडळ, शिवनेरी गणेश मंडळ, समर्पण ग्रुप, गुरूदेव सेवा मंडळ, एकता मित्र मंडळ व श्रीरामपूरवासीयांनी सहकार्य केले.

Web Title: The wretched wounds at Dhankeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.