‘बेंबळा’चे काम थंडावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 10:04 PM2018-07-18T22:04:38+5:302018-07-18T22:05:07+5:30

संपूर्ण उन्हाळाभर चर्चेत राहिलेल्या बेंबळा प्रकल्पाच्या चाचणीचे काम गेली १५ दिवसांपासून थांबले आहे. टाकळी गावाजवळ फुटलेली पाईप लाईन दुरुस्त करण्याची तसदीही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतली नाही. त्यामुळे सध्या तरी टाकळीच्या सम्पमध्ये पाणी पोहोचण्याचे लक्षणं दिसत नाही.

The work of 'Bemblea' will be stopped | ‘बेंबळा’चे काम थंडावले

‘बेंबळा’चे काम थंडावले

Next
ठळक मुद्देअमृत योजना : फुटलेला पाईप जोडलाच नाही, चाचणीही थांबली

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संपूर्ण उन्हाळाभर चर्चेत राहिलेल्या बेंबळा प्रकल्पाच्या चाचणीचे काम गेली १५ दिवसांपासून थांबले आहे. टाकळी गावाजवळ फुटलेली पाईप लाईन दुरुस्त करण्याची तसदीही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतली नाही. त्यामुळे सध्या तरी टाकळीच्या सम्पमध्ये पाणी पोहोचण्याचे लक्षणं दिसत नाही.
यवतमाळ शहराला २४ तास पाणीपुरवठ्यासाठी ३०२ कोटींची ‘अमृत योजना’ हाती घेण्यात आली. बाभूळगाव तालुक्याच्या बेंबळा प्रकल्पावरून यवतमाळात पाणी आणण्यासाठीची ही योजना आहे. दरम्यान, यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा आणि चापडोह प्रकल्प कोरडे पडण्याचे चित्र दिसताच बेंबळाच्या कामाला गती देण्यात आली. टाकळी गावापर्यंत पाईप लाईन टाकल्यानंतर चाचणी सुरू करण्यात आली. मात्र पाईपने दगा दिला. पहिला पाईप भिसनी गावाजवळ फुटला. दुसऱ्या दिवशी नवीन पाईप टाकून पुन्हा चाचणी सुरू केली. यात यश येत नाही तोच गळव्हा गावातील एका शेतात मोठा पाईप फुटला. यात चार शेतकºयांचे नुकसान झाले. हे काम संपून पुन्हा चाचणीसाठी उभी राहिलेली यंत्रणा टाकळी गावाजवळ पाईप फुटल्याने थांबून गेली.
टाकळीचे पाईप अजूनही फुटलेले आहेत. क्वॉलिटी कंट्रोल विभागाकडून पाहणी झाल्याशिवाय नवीन पाईप टाकला जाणार नाही. दरम्यान, हायड्रोलिक सिस्टीमने चाचणी घेण्याच्या विचारात हा विभाग आहे. ५ जुलै रोजी टाकळी येथे पाईप फुटला. त्यावरून उणेपुरे दोन आठवडे लोटले. परंतु क्वॉलिटी कंट्रोल विभागाची चमू याठिकाणी पोहोचली नाही. योजनेसाठी वापरण्यात आलेले फुटलेले पाईप पाईप निकृष्ट होते हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिषाची गरज नाही. आता क्वॉलिटी कंट्रोल विभाग यातून काय शोधणार, हा नागरिकांचा प्रश्न आहे. २०१९ पर्यंत योजना पूर्ण करायची आहे, असा पाढा नेहमी वाचला जातो. कामाची गती अशीच राहिल्यास निर्धारित कालावधित योजना पूर्णत्वास जाण्याविषयी शंका आहे.

Web Title: The work of 'Bemblea' will be stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.