महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 10:05 PM2019-06-13T22:05:33+5:302019-06-13T22:06:11+5:30

राज्यात वाढत असलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध करीत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. येथील पोलीस अधीक्षक कार्यालयापुढे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. क्रांती राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

Women's Nationalist Congress bells | महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा घंटानाद

महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा घंटानाद

googlenewsNext
ठळक मुद्देमहिला अत्याचार वाढले : गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यात वाढत असलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध करीत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. येथील पोलीस अधीक्षक कार्यालयापुढे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. क्रांती राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
नागपूर येथे चार वर्षीय चिमुकलीवर शाळेच्या आवारात अतिप्रसंग करण्यात आला. या घटनेचा यावेळी महिलांनी तीव्र निषेध नोंदविला. दरदिवशी शंभरपेक्षा अधिक महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. यातून राज्यात महिला, मुलींमध्ये असुरक्षिततेची भीती निर्माण झाली आहे. गृहखाते खुद्द मुख्यमंत्र्यांकडे असूनही अत्याचार वाढत असल्याने मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी गृहमंत्री पदाचा राजिनामा द्यावा, अशी मागणी यावेळी जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत यांनी केली.
आंदोलक महिलांनी पोलीस अधिकारी गौतम यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागण्यांचे निवेदन पाठविले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात क्रांती राऊत, अश्विनी टेकाम, वर्षा आखरे, वंदना मोहीतकर, ज्योती निरपासे, निखिल राठोड, मोहन दानतकर, दिव्या दानतकर, बेबी ठाकरे, गयाबाई वनकर, पार्वती उईके, योगीता भोयर, उमा राखुंडे, अनिता वेरणे आदी उपस्थित होत्या.

Web Title: Women's Nationalist Congress bells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.