महिलांचा दारूबंदी महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 10:07 PM2019-01-18T22:07:56+5:302019-01-18T22:08:57+5:30

स्वामिनीच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध संघटनांनी एकत्र येत संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली. शुक्रवारी जिल्हाभरातून आलेल्या मोर्चेकरी महिलांनी समता मैदान फुलून गेले होते. ‘वारे सरकार तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल’ असे नारे देत विविध मार्गावरून फिरत मोर्चाचा समारोप समता मैदानावर झाला.

Women's Darwindi Mahamarcha | महिलांचा दारूबंदी महामोर्चा

महिलांचा दारूबंदी महामोर्चा

Next
ठळक मुद्देहजारोंचा आक्रोश : वारे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महेंगा तेल

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्वामिनीच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध संघटनांनी एकत्र येत संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली. शुक्रवारी जिल्हाभरातून आलेल्या मोर्चेकरी महिलांनी समता मैदान फुलून गेले होते. ‘वारे सरकार तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल’ असे नारे देत विविध मार्गावरून फिरत मोर्चाचा समारोप समता मैदानावर झाला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी सरकार विरोधात आवाज उठविला. या मोर्चामध्ये अपंगांसह, तालुक्याच्या ठिकाणांहून पायी आलेल्या वृद्ध महिलांनी हिरीरीने सहभाग नोंदविला.
दारूबंदीच्या मागणीसाठी स्वामिनी संघटना चार वर्षांपासून आंदोलने करीत आहे. शुक्रवारी स्वामिनीसोबत विविध संघटनांनी एकत्र येत महामोर्चा काढला. गडचिरोली जिल्ह्यात मुक्तीपथ प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन आणि सर्च संस्था यांनी दारूनियंत्रणाचा पथदर्शी प्रकल्प प्रभावीपणे राबविला. त्या धर्तीवर यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीनंतर पुढील दारूनियंत्रणासाठी मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी मोर्चेकºयांनी केली.
मोर्चाच्या अग्रस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा फोटो होता. त्यामागे गरुदेव सेवा मंडळाची टिम होती. त्यामागे दारूबंदीचे फलक घेऊन जाणाºया महिला होत्या. ‘वारे सरकार तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल’, ‘या सरकारचे करायचे काय, उलटे डोके वरती पाय’ अशा घोषणा देण्यात आल्या. या मोर्चामध्ये १५० किमी अंतरावरून पायपीट करीत आलेल्या महिलांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी ११ मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघ, प्रहार, गुरूदेव सेवा मंडळ, शेतकरी वारकरी संघटना, पोलीस पाटील संघटना, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ, संभाजी ब्रिगेड, इंडियन मेडिकल असोसिएशन, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, आॅल इंडिया बंजारा सेवा संघ, प्रजापिता ब्रह्मकुमारी इश्वरी विश्व विद्यालय, जिजाऊ ब्रिगेड, अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना, आयटक, बिरसा ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, जमाते इस्लाम हिंद, अल्कोहोलीक एनॉनिमस, गणेश दुर्गा मंडळ, अस्तित्व फाऊंडेशन, माळी समाज, माहेश्वरी मंडळ, बचतगट आणि विविध सामाजिक गृपचा आंदोलनामध्ये सहभाग होता.
दारूबंदीसाठी टॉवरवर इसमाची ‘वीरूगिरी’
यवतमाळ : शहरात स्वामिनी दारूबंदी संघटनेने मोर्चाचे आयोजन केले होते. ग्रामीण भागातून मोठ्यासंख्येने महिला आल्या होत्या. हे दृष्य पाहून शुक्रवारी दुपारी नेताजीनगर येथील इसमानेही दुरसंचार विभागाच्या टॉवरवर ठाण मांडले. मोर्चाच्या बंदोबस्ता असलेल्या पोलिसांची ऐन वेळी तारांबळ उडाली. त्यांनी घटनास्थळ गाठून आंदोलकाशी मोबाईलद्वारे चर्चा केली. विलास तुकाराम पवार (५२) रा. नेताजीनगर असे विरूगीरी करणाऱ्या इसमाचे नाव आहे. विलासने नेजातीनगर परिसरातील दारू भट्टी बंद व्हावी या मागणीसाठी थेट टॉवर ठिय्या दिला. टॉवरवर कोणीतरी चढल्याचे दिसातच परिसरात बघ्याची मोठी गर्दी जमा झाली. शहर ठाण्याच्या शोध पथकाने घटनास्थळ गाठले. सहायक निरीक्षक मिलन कोयल यांनी दूरध्वनीवरून चर्चा करून त्याला खाली उतरवले.

Web Title: Women's Darwindi Mahamarcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.