यवतमाळ जिल्ह्यात रुग्णवाहिकेत झाली महिला प्रसूत; मुसळधार पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 01:09 PM2018-08-17T13:09:33+5:302018-08-17T13:11:39+5:30

आर्णी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे रस्ते ठप्प झाले होते. राणीधानोरा येथे रुग्णवाहिकेतच एका महिलेची प्रसुती करण्याचा प्रसंग डॉक्टरांवर ओढवला. अशा बिकट परिस्थितीत त्यांनी प्रसंगावधान राखत तिची सुखरुप प्रसुती केली.

Woman delivered a baby in ambulance in Yawatmal district | यवतमाळ जिल्ह्यात रुग्णवाहिकेत झाली महिला प्रसूत; मुसळधार पावसाचा फटका

यवतमाळ जिल्ह्यात रुग्णवाहिकेत झाली महिला प्रसूत; मुसळधार पावसाचा फटका

Next
ठळक मुद्देपावसामुळे रस्ते झाले बंदडॉक्टरांच्या तत्परतेमुळे आई व बाळ सुखरूप

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: आर्णी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे रस्ते ठप्प झाले होते. राणीधानोरा येथे रुग्णवाहिकेतच एका महिलेची प्रसुती करण्याचा प्रसंग डॉक्टरांवर ओढवला. अशा बिकट परिस्थितीत त्यांनी प्रसंगावधान राखत तिची सुखरुप प्रसुती केली.
राणीधानोरा येथील रहिवासी नंदा शंकर इंगळे या महिलेला गुरुवारी प्रसुतीकळा सुरू झाल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र हे लोनबेहळ येथे असल्याने तिला तेथे नेणे आवश्यक होते. मात्र पावसामुळे रस्ता बंद झाला होता. बिकट परिस्थितीचे भान राखून गावातील आशा वर्कर मंगला सोयाम यांनी लोनबेहळ येथील डॉक्टर निरंजन जाधव यांच्यासोबत भ्रमणध्वनीवर तात्काळ संपर्क साधला व त्यांना परिस्थितीची कल्पना दिली. डॉक्टरांनीही वेळ न दवडता रुग्णवाहिका बोलावून राणीधानोराकडे कूच केले. मात्र दरम्यान असलेल्या नाल्यावरून पाण्याचा जोरदार प्रवाह असल्याने त्यावरून गाडी जाऊ शकत नव्हती. नाल्याच्या दुसऱ्या काठावर या महिलेला तिच्या नातेवाईकांनी आणले होते. काय करावे कुणालाच काही सुचत नव्हते. अखेरीस हिंमत करून नातेवाईकांनी या महिलेला अक्षरश: हातावर उचलून नाल्याच्या पलिकडे रुग्णवाहिकेत नेले. रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्राकडे निघाली मात्र दरम्यान तिच्या प्रसूतीकळा वेगाने सुरू झाल्याने त्यांना रुग्णवाहिका रस्त्यातच थांबवावी लागली. प्रसंगावधान राखत डॉक्टरांनी तसेच रुग्णवाहिका चालक बाबाराव गावंडे यांनी महिलेच्या नातेवाईकांच्या मदतीने तिची प्रसुती रुग्णवाहिकेतच केली. महिला व तिचे बाळ सुखरुप असल्याबद्दल नातेवाईकांनी व गावकºयांनी डॉक्टरांचे अभिनंदन केले आहे.
 

Web Title: Woman delivered a baby in ambulance in Yawatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य