तुमचं आमचं नातं काय? जय भवानी, जय शिवराय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 09:59 PM2018-03-04T21:59:04+5:302018-03-04T21:59:04+5:30

शिवजयंतीनिमित्त रविवारी यवतमाळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निघालेल्या सर्वधर्मसमभाव रॅलीने लक्ष वेधले.

What's your niece? Jai Bhavani, Jai Shivrai | तुमचं आमचं नातं काय? जय भवानी, जय शिवराय

तुमचं आमचं नातं काय? जय भवानी, जय शिवराय

Next
ठळक मुद्देशिवजयंतीचा जल्लोष : जयघोषाने आसमंत दणाणला

ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : शिवजयंतीनिमित्त रविवारी यवतमाळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निघालेल्या सर्वधर्मसमभाव रॅलीने लक्ष वेधले. तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय अशा जय घोषाने आसमंत दुमदुमले.
स्थानिक माळीपुऱ्यातील शिवजयंती उत्सव समिती आणि शिवाजी मंडळ यवतमाळ यांनी रविवारी तिथीनुसार शिवजयंतीचे आयोजन केले होते. पहाटे शिवजन्माचा पाळणा म्हणण्यासाठी शिवभक्तांनी माळीपुऱ्यात गर्दी केली होती. पहाटे शिवरायांचा जन्मोत्सव विश्वमांगल्य सभा भगिनींच्या उपस्थितीत झाल्यानंतर प्रभातयात्रा काढण्यात आली. विविध चौकांमध्ये रॅलीचे स्वागत करण्यात आले. यामध्ये आबाल वृद्धांसह महिला, युवती सहभागी झाल्या होत्या. शिवजयंतीनिमित्त दौैैड स्पर्धा झाली. सायंकाळी शोभायात्रा निघाली. यामध्ये शिवरायांच्या इतिहासाला उजाळा देणाऱ्या विविध झाँकी होत्या.
सहपालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले. नगराध्यक्ष कांचन चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंंगळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायकवाड, यवतमाळ विधानसभा संपर्कप्रमुख संतोष ढवळे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, उपस्थित होते.
बसस्थानक चौकाजवळील शिवतिर्थावर पहाटेपासून शिवभक्तांची गर्दी झाली होती. शिवप्रेमींनी या ठिकाणावरून सर्वधर्मसमभाव रॅली काढली. स्थानिक डा.मा.म आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंती साजरी केली. आयुर्वेदिक महाविद्यालय, शिवाजी उद्यान ते शिवतिर्थ अशी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी निमा स्टुडंट फोरमचे अध्यक्ष डॉ. सूरज दहात्रे, डॉ. राहुल पवार, डॉ. अक्षय शिकारे, डॉ. स्वप्नील अनाळकर, डॉ. गौरव चौधरी, डॉ. सुशिल गर्जे, डॉ. समीक्षा बांगडे, राहुल बांडे, अरूण मोरे आदी उपस्थित होते. कृष्णा पुसनाके, संजय देठे, अब्दुल साजीद, अभिजित नानवटकर, विकास पवार, गुणवंत गणवीर, सुनिता पारखे, अजय गोडबोले, पराग बारले, सय्यद जब्बार , इम्रान अली, रियाज अली, हसनभाई, अभिजित गावंडे, संदीप भिसे, प्रणय डोईजड, अंकुश खोपडे आदींनी रॅलीच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Web Title: What's your niece? Jai Bhavani, Jai Shivrai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.