‘वॉटर कप’ला चिमुकल्यांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 09:29 PM2019-04-22T21:29:28+5:302019-04-22T21:29:45+5:30

शहरापासून दहा किलोमीटरवर वसलेले साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव झाडगाव. श्रमदानावर आधारित असलेल्या वॉटर कप स्पर्धेला या गावात साथ मिळत नव्हती. परंतु पाणलोटचे प्रशिक्षण घेतलेल्या रुपेश रेंगे यांना एका वेगळ्याच विचाराने झपाटलेले होते. काहीही झाले तरी श्रमदान आपण करूच हा निर्धार झालेल्या रुपेशला साथ मिळाली ती चिमुकल्यांची. लहान हात कोवळ्या उन्हात खेळायला निघायचे सोडून गाव पाणीदार करण्यासाठी श्रमदान करायला निघालेत. या गावाने सुजाता भगत आणि रूपेश रेंगे यांच्यासारखे जलयोध्ये तयार केलेत.

'Water Cup' with Tweezers | ‘वॉटर कप’ला चिमुकल्यांची साथ

‘वॉटर कप’ला चिमुकल्यांची साथ

Next
ठळक मुद्देझाडगावात उत्साह : सलग तिसऱ्या वर्षी सहभाग, युवकांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : शहरापासून दहा किलोमीटरवर वसलेले साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव झाडगाव. श्रमदानावर आधारित असलेल्या वॉटर कप स्पर्धेला या गावात साथ मिळत नव्हती. परंतु पाणलोटचे प्रशिक्षण घेतलेल्या रुपेश रेंगे यांना एका वेगळ्याच विचाराने झपाटलेले होते. काहीही झाले तरी श्रमदान आपण करूच हा निर्धार झालेल्या रुपेशला साथ मिळाली ती चिमुकल्यांची. लहान हात कोवळ्या उन्हात खेळायला निघायचे सोडून गाव पाणीदार करण्यासाठी श्रमदान करायला निघालेत. या गावाने सुजाता भगत आणि रूपेश रेंगे यांच्यासारखे जलयोध्ये तयार केलेत.
चांगल्या सवयी लागायला वेळ लागतोच. झाडगावला श्रमदानाची सवय लागायला २०१७ वर्ष उलटले. २०१८ मध्ये वॉटर कप स्पर्धा पुन्हा दारात. रुपेशला पुन्हा चिमुकल्यांची साथ मिळाली. आम्हाला बक्षिसाच बाशिंग नको पण गाव पाणीदार झालं पाहिजे हाच निस्वार्थी भाव त्या चिमुकल्यांच्या चेहºयावर. स्पर्धा संपली. पण सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९. झाडगाव पुन्हा मैदानात उतरले. गावातील दहा लोकांनी पाणलोटच प्रशिक्षण घेतले. रुपेशच्या साथीला पुन्हा नव्या ताकदीने चिमुकले तयार. रात्रंदिवस एक करू पण माघार घायची नाही. लहान मुलांनीच गावाचा उत्साह वाढविला.
यावर्षी लहान चिमुकल्यांची सेना शिवारात हातात कुदळ फावड घेऊन दाखल झाली. स्पर्धा सुरू झाल्यापासून या चिमुकल्या हातानी कुदळ नाही सोडली. त्यांच्या साथीला गावातील फुटबॉल खेळाडू श्रमदान करायला पुढे सरसावले. श्रमदानाचा प्रश्न सुटला, पण मशीनची समस्या होती. अशातच एक स्नेहालय अहमदनगर नावाची संस्था पुढे सरसावली. मदतीचा हात देऊ लागली. एका आठवड्यात जेवढा निधी देणगीदार देणार, तेवढा निधी ईश्वर चिठ्ठीतून काढून जी गावे २० गुण मिळवतील त्या गावाला द्यायचा असं ठरवलं गेलं. एवढे गुण घ्यायचेच या ध्येयाने चिमुकल्यांना झपाटले. दिवसाला तीन शिफ्टमध्ये काम करत होती. अखेर झाडगावला मशीन काम कारणासाठी एक लाख रुपये मिळाले. त्यामुळे नव्या ऊर्जेला आता गती मिळाली. या गावात वॉटर कप स्पर्धेचं काम मोठ्या उत्साहात सुरू आहे.

Web Title: 'Water Cup' with Tweezers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.