वणीत कॉंग्रेसचा जनआक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:21 PM2017-10-17T23:21:30+5:302017-10-17T23:21:50+5:30

सध्या सुरू असलेल्या शेतकºयांना विषबाधा होण्याच्या घटना, शेतमाल विकताना शेतकºयांची होणारी लूट याची जाणिव शासनाला करून देण्यासाठी वणी, मारेगाव व झरी तालुका कॉंग्रेस ....

Vainit Congress Janrakosh Morcha | वणीत कॉंग्रेसचा जनआक्रोश मोर्चा

वणीत कॉंग्रेसचा जनआक्रोश मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देशासनाला निवेदन : सरसकट कर्जमाफीसह विविध मागण्या

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : सध्या सुरू असलेल्या शेतकºयांना विषबाधा होण्याच्या घटना, शेतमाल विकताना शेतकºयांची होणारी लूट याची जाणिव शासनाला करून देण्यासाठी वणी, मारेगाव व झरी तालुका कॉंग्रेस कमिटीच्यावतीने मंगळवारी वणीत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तीनही तालुक्यातील शेकडो पदाधिकारी,कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.
स्थानिक वसंत जिनिंगमधून या मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार वामनराव कासावार, माजी जि.प.सभापती नरेंद्र ठाकरे, अ‍ॅड.देविदास काळे, जि.प.सभापती अरुणा खंडाळकर, मोरगावच्या पं.स.सभापती शितल पोटे, झरीचे भिमारेड्डी बाजन्लावार, राजू येल्टीवार यांनी केले.
मोर्चा उपविभागीय कार्यालयावर पोहचल्यानंतर उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. शेतकºयांना विनाअट सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, विषबाधेत मृत्यू पावलेल्या शेतकºयांच्या कुटुंबियाला दहा लाखांची मदत देण्यात यावी, कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची सरकारने अंमलबजावणी करावी, वणी परिसरातील लोडशेडींग त्वरित बंद करावे, यासह अनेक मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
मोर्चाच्या यशस्वीतेसाठी वणी तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विवेक मांडवकर, शहर अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर, पुरूषोत्तम आवारी, राकेश खुराणा, प्रमोद वासेकर, शालिनी रासेकर, वंदना धगडी, भास्कर गोरे, सुरेश बन्सोड, जि.प.सदस्य अनिल देरकर, राजीव कासावार, संदीप बुर्रेवार यांच्यासह तिनही तालुक्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Vainit Congress Janrakosh Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.