आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना गणवेश सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:02 AM2019-06-05T00:02:53+5:302019-06-05T00:03:11+5:30

पावसाळ्यात ग्रामीण भागामध्ये आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. साथरोगाची लागण होते. अशा स्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी वेळेत उपलब्ध होत नाही. या सर्वांना मुख्यालयी पूर्णवेळ उपस्थित राहून सेवा देण्याचे आदेश आहेत.

Uniforms for doctors, employees in health centers | आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना गणवेश सक्ती

आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना गणवेश सक्ती

Next
ठळक मुद्देबायोमेट्रिक अटेंडन्स : पावसाळ्याच्या तोंडावर आरोग्य सहसंचालकांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पावसाळ्यात ग्रामीण भागामध्ये आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. साथरोगाची लागण होते. अशा स्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी वेळेत उपलब्ध होत नाही. या सर्वांना मुख्यालयी पूर्णवेळ उपस्थित राहून सेवा देण्याचे आदेश आहेत. शिवाय सामान्य नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी या अधिकारी, कर्मचाऱ्यांची ओळख पटावी म्हणून त्यांना कर्तव्यावर असताना गणेवश सक्तीचा करण्यात आला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य उपकेंद्रावर शासनाकडून कोट्यवधीचा खर्च होतो. प्रत्यक्ष या यंत्रणेचा उपयोग होताना दिसत नाही. ग्रामीण भागात डॉक्टर व कर्मचारी राहण्यास तयार नाही. ग्रामीण आरोग्य यंत्रणा पूर्णत: ‘अपडाऊन’ करूनच काम करते. याचा फटका ग्रामीण रुग्णांना बसतो. त्यांना उपचारासाठी थेट तालुका अथवा जिल्हा मुख्यालयात यावे लागते. महिलांच्या प्रसुतीचीसुद्धा हिच अवस्था आहे. अपवादानेच आरोग्य केंद्रात कधीतरी डॉक्टर उपलब्ध होतात. या संपूर्ण प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य केंद्रातील कर्मचाºयांना पूर्णवेळ गणेवश तर डॉक्टरांना ‘अ‍ॅप्रन’ घालून काम करावे लागणार आहे.
शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर आतून व बाहेरून स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आंतररूग्ण विभाग, प्रसुती कक्ष, स्वच्छतागृह आणि आरोग्य उपकेंद्रातील प्रसुती कक्ष व स्वच्छतागृह अस्वच्छ आढळल्यास तेथील डॉक्टर व कर्मचाºयांवर कारवाई केली जाणार आहे.
याशिवाय कर्मचारी व डॉक्टरांच्या नियमित उपस्थितीसाठी प्रत्येक ठिकाणी बायोमेट्रिक हजेरीपट लावण्यात आला आहे. याचा नियमित अहवाल घेऊन संबंधितांचे वेतन काढण्यात येणार आहे. बायोमेट्रिक हजेरीपटाची नोंदणी नियमित करणे व ही यंत्रणा सुरळीत सुरू राहण्यासाठी जबाबदारी निश्चित केली आहे.
या संपूर्ण आदेशाची अंमलबजावणी करून त्याचा अहवाल आरोग्य सेवा संचालनालयाने मागितला आहे. याबाबत सहसंचालक डॉ. विजय कद्रेवाड यांनी आदेश निर्गमित केला आहे.

Web Title: Uniforms for doctors, employees in health centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :docterडॉक्टर