एससी, एसटी, ओबीसीचं शिक्षण थांबविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 11:47 PM2019-01-16T23:47:42+5:302019-01-16T23:48:01+5:30

एससी, एसटी, ओबीसी हा अशिक्षित राहील तेवढं राज्य पुढ चालत राहील. शिक्षण वाढल्यास स्पर्धा वाढेल व सहज मिळणारी सत्ता हाती येणार नाही. यामुळे राज्यकर्त्यांनी शिक्षण थांबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा घाणाघात भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळातील महासभेत केला.

Trying to stop SC, ST, OBC education | एससी, एसटी, ओबीसीचं शिक्षण थांबविण्याचा प्रयत्न

एससी, एसटी, ओबीसीचं शिक्षण थांबविण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : वंचित बहुजन आघाडीची सत्तासंपादन महासभा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एससी, एसटी, ओबीसी हा अशिक्षित राहील तेवढं राज्य पुढ चालत राहील. शिक्षण वाढल्यास स्पर्धा वाढेल व सहज मिळणारी सत्ता हाती येणार नाही. यामुळे राज्यकर्त्यांनी शिक्षण थांबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा घाणाघात भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळातील महासभेत केला.
येथील समता मैदानावर बहुजन वंचित आघाडीची सत्ता संपादन महासभा बुधवारी सायंकाळी झाली. यावेळी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी भाजपा व विरोधी काँग्रेसवर सडकून टिका केली. राज्यातील एससी, एसटी व ओबीसी या तिन्ही वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचं बजेट हे केवळ ५०० कोटी इतकच आहे. मात्र सरकारची दानत नाही. या वर्गाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न हे सरकार करतंय. शिक्षण सर्वांना आणि शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे, ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे. आज मेडिकल व अभियांत्रिकीच्या ओबीसींच्या १५ टक्के जागा केवळ ऐपत नसल्यामुळे रिक्त राहतात. हे महागड शिक्षण सर्वसामान्यांच्या ऐपतीत आलं पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
सभेला एमआयएमचे संस्थापक अध्यक्ष खासदार असुद्दूद्दीन ओवैसी येणार होते. मात्र त्यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला. तसेच एमआयएमचे आमदारही सभेला उपस्थित नव्हते. एमआयएमच्यावतीने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संबोधित केले.

८५० कोटी घोषणा म्हणजे फसवणूक
आता निवडणुका डोळ्यापुढे पाहून भाजपा ओबीसींच्या हिताची भाषा बोलतंय ही भूमिका त्यांनी यापूर्वी का घेतली नाही, याचा खुलासा करावा. लोकसभेतील आरक्षणाच्या जागा सोडून इतर मतदारसंघातून ओबीसीतील अलुतेदार, बलुतेदारांना संधी का दिली नाही. आज राज्य सरकारने ओबीसीसाठी ८५० कोटींच्या आर्थिक तरतूदीची घोषणा केली. मात्र ही चक्क फसवणूक आहे. आधी हे बिल विधानसभेत मंजूर करावं लागतं. त्याशिवाय सर्वसामान्यांना लाभ मिळणार नाही. खऱ्याअर्थानं लोकशाहीचं सामाजिकरण करण्याची गरज आहे. राज्यातील केवळ १६९ कुटुंबांकडेच आलटून पालटून सत्ता राहिली आहे. सत्तेला घातलेले बांध फोडल्याशिवाय तिचं सामाजिकरण होणार नाही. यासाठीच वंचित बहुजन आघाडी स्थापन केल्याचे बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले.

Web Title: Trying to stop SC, ST, OBC education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.