शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 10:23 PM2018-03-17T22:23:00+5:302018-03-17T22:23:00+5:30

गत २० वर्षात शेती आणि शेतकऱ्यांसमोर असंख्य प्रश्न उभे ठाकले आहे. या प्रश्नातून मार्ग काढीत शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले जात आहे. यासोबतच नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, ...

Tried for the progress of farmers | शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न

Next
ठळक मुद्देमदन येरावार : कृषी महोत्सवाचे थाटात उद्घाटन, ४० हजार पदवीधर शेतकऱ्यांच्या बांधावर

ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : गत २० वर्षात शेती आणि शेतकऱ्यांसमोर असंख्य प्रश्न उभे ठाकले आहे. या प्रश्नातून मार्ग काढीत शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले जात आहे. यासोबतच नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. समता मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून सहपालकमंत्री संजय राठोड, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, कृषी विकास अधिकारी कैलास वानखडे, आत्माचे संचालक दत्तात्रय काळे, डॉ. प्रमोद यादगिरवार उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे आहे. आजपर्यंतच्या सर्व उणीवा दूर करण्यासाठी काम करीत आहे. तत्कालीन सरकारमधील पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जाहीर केलेले पॅकेज आमच्या सरकारने पूर्ण केले. विजेचा बॅकलॉग पूर्ण करून नवीन केंद्र उभारले जात आहे. मुबलक पाणी आणि मुुबलक वीज असेल तर शेतकºयांची प्रगती थांबविता येणार नाही.
त्या दृष्टीने सरकारने प्रयत्न सुरू केले आहे. मागेल त्याला शेततळे आणि मागेल त्याला वीेज देण्याचा कार्यक्रमही हाती घेण्यात आला आहे. साडेसहा हजार शेततळे पूर्ण केले आहेत. पुढे शेततळे निर्माण केले जाणार आहे.
सहपालकमंत्री संजय राठोड म्हणाले, पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन काम करणे काळाची गरज आहे. हे तंत्रज्ञान शेतकºयांच्या बांधापर्यंत पोहचावे यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे.
हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय काळे यांनी केले.
सूत्रसंचलन कैलास राऊत यांनी केले. तर आभार प्रदर्शन कृषी विकास अधिकारी कैलास वानखडे यांनी मानले.
शेतकºयांना नवीन तंत्रज्ञान मिळावे आणि ते समजावे म्हणून कृषी पदवी घेतलेले ४० हजार पदवीधर आणि विद्यार्थी शेतकºयांच्या बांधावर पोहचतील.
शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतील. त्यांना मार्गदर्शन करतील, असे सूतोवाच पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. कृषी विद्यालयाला स्टाफ देण्याची कारवाई पूर्ण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकरी बचतगट आणि महिला बचतगटातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

Web Title: Tried for the progress of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.