‘चिंतामणी’च्या तीन बस प्रवाशांनी अडविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 09:48 PM2018-01-14T21:48:08+5:302018-01-14T21:48:25+5:30

येथून मुंबईकडे निघालेली खासगी बस मध्येच बिघडल्याने यवतमाळच्या प्रवाशांना सिंदखेडराजा येथे अख्खी रात्र थंडीत कुडकुडत उघड्यावर काढावी लागली. तर सकाळी संतप्त प्रवाशांनी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या तीन बसेस रोखून धरल्याने तणाव निर्माण झाला होता.

Three bus passengers of 'Chintamani' blocked it | ‘चिंतामणी’च्या तीन बस प्रवाशांनी अडविल्या

‘चिंतामणी’च्या तीन बस प्रवाशांनी अडविल्या

googlenewsNext
ठळक मुद्देमेहकरजवळ बस बिघडली : रात्रभर थंडीने कुडकुडलेले प्रवासी पहाटे संतापले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथून मुंबईकडे निघालेली खासगी बस मध्येच बिघडल्याने यवतमाळच्या प्रवाशांना सिंदखेडराजा येथे अख्खी रात्र थंडीत कुडकुडत उघड्यावर काढावी लागली. तर सकाळी संतप्त प्रवाशांनी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या तीन बसेस रोखून धरल्याने तणाव निर्माण झाला होता.
येथील चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस (क्र. एमएच २९ टी ४०००) १३ जानेवारीला दुपारी ४.३० वाजता प्रवासी घेऊन मुंबईकडे रवाना झाली. मात्र रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ही बस मेहकरजवळ बिघडली. जवळपास तीन तास बस तेथेच उभी होती. चालक रामराव राठोड यांनी कशीबशी बस दुरुस्त सिंदखेडराजा टीपॉर्इंटपर्यंत आणली. मात्र पुन्हा बस बिघडली. त्यामुळे प्रवासी चिडले. चालकाने मालकाला फोन करून याची माहिती दिली. तासाभरात दुसरी गाडी पाठवितो, असे मालकाने सांगितल्याने प्रवासी शांत झाले. मात्र रात्र उलटून गेली तरी दुसरी बस न आल्यामुळे प्रवासी प्रचंड संतापले. गाडीतील महिला, मुले यांना संपूर्ण रात्र भर थंडीतच घालवावी लागली. चिडलेल्या प्रवाशांनी सकाळी औरंगाबाद, पुणेकडून येणाºया चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या तीन बसेस सिंदखेडराजा येथे अडविल्या. त्यावेळी चालक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊन तणावाची स्थिती निर्माण झाली. अडविलेल्या गाड्यांपैकी एका गाडीत आम्हाला बसवा, असा हट्ट प्रवाशांनी धरला. मात्र अडविलेल्या गाडीतील प्रवासी उतरण्यास तयार नव्हते. त्यामुळे राडा वाढला. माहिती मिळताच स्थानिक पोलीस निरीक्षक शिवाजी शिंगनवाड, पोलीस कर्मचारी कुडे घटनास्थळी आले. त्यांच्या मध्यस्थीने यवतमाळकडे जाणाºया प्रवाशांना खाजगी गाड्यांनी पाठवून देण्यात आले. तसेच सकाळी ८ वाजता चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसने संतप्त प्रवाशांना मुंबईकडे रवाना करण्यात आले.
प्रवासी सुरक्षित
यवतमाळ येथील चिंतामणी ट्रॅव्हल्सचे संचालक गुड्डू जयस्वाल यांनी सांगितले की, बस बिघडल्याने वाद झाला होता. रात्रीची वेळ असल्याने दुसºया वाहनाची व्यवस्था तातडीने होणे शक्य नव्हते. नंतर तीन सुमो गाड्यांची व्यवस्था करून प्रवाशांना पुढे पाठविण्यात आले. तसेच यवतमाळकडे येणाºया प्रवाशांनाही सुरक्षितपणे यवतमाळात पोहोचविले.

Web Title: Three bus passengers of 'Chintamani' blocked it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Travelप्रवास