यवतमाळ जिल्ह्यातल्या ३१ हजार महिलांची वज्रमूठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:39 PM2018-03-08T12:39:48+5:302018-03-08T12:39:56+5:30

गेल्या वर्षी जिल्ह्यातील १० तालुक्यातील महिला बचतगटांनी कृषीसेवा केंद्र सुरू केले. यातून वर्षभरात तब्बल साडे सहा कोटींची उलाढाल झाली.

Thirty-six thousand women in Yavatmal district gathered | यवतमाळ जिल्ह्यातल्या ३१ हजार महिलांची वज्रमूठ

यवतमाळ जिल्ह्यातल्या ३१ हजार महिलांची वज्रमूठ

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यातील ३१ हजार महिलांनी वज्रमूठ बांधून तब्बल २१ कोटींची गंगाजळी निर्माण केली. त्यातून उद्योग थाटून वर्षभरात तब्बल ९१ कोटींचे उद्योग उभे केले. महिला बचत गटाच्या या क्रांतीने जिल्ह्याचे चित्र पालटून गेले.

रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महिला आर्थिक विकास महामंडळ, नागरी उपजिवीका अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात महिला बचतगटांचा प्रवास सुरू झाला. गाव पातळीवर सर्व बचतगटांना एकत्र जोडण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळ करीत आहे. या महिलांच्या बचतीतून मोठी बचत झाली. त्यातून बचतगट मोठ्या उद्योगांची निर्मिती करण्यास पुढे सरसावले. पहिला प्रयोग गतवर्षी यशस्वी झाला.
गेल्यावर्षी जिल्ह्यातील १० तालुक्यातील महिला बचतगटांनी कृषीसेवा केंद्र सुरू केले. यातून वर्षभरात तब्बल साडे सहा कोटींची उलाढाल झाली. ना नफा-ना तोटा या तत्वावर सुरू झालेले या कृषीसेवा केंद्रांनी शेतकऱ्यांचीही आर्थिक बचत झाली. यामुळे यावर्षी आणखी काही कृषीसेवा केंद्र सुरू करण्यास महिला पुढे येण्याची शक्यता आहे. पशुसखीच्या माध्यमातून पशुधन वाढविण्यासाठी महिलांनी वाटचाल सुरू केली. शेळ्या, कोंबड्या, दुधाळ जनावरांचे उत्पादन वाढण्यास सुरूवात झाली. परिणामी पशुंचा मृत्यू दर २० टक्क्यांवरून पाच टक्क्यापर्यंत खाली आला.
आधुनिक युगात महिला मागे पडू नये म्हणून त्यांना आता मोबाईल आणि इंटरनेट हाताळण्याचे तंत्रज्ञान शिकविले जात आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर याच महिला गावोगावी जाऊन इतर महिलांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करणार आहे. यातून नवीन क्रांती घडण्याचे संकेत आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गटांची चळवळ सक्षम झाली. त्यांना आवश्यक कौशल्य प्रदान करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. यातून गावांचे चित्र बदलत आहे.
- डॉ. रंजन वानखडे
जिल्हा समन्वयक महिला
आर्थिक विकास महामंडळ

नॅशनल लॉयलीउड मिशन ते सीएमआरसी सेंटर
महाराष्ट्र जीवन्नोती अभियानाअंतर्गत नॅशनल लॉयलीउड मिशन काम करीत आहे. या मिशनच्या माध्यमातून गावांतील बचत गटांची बांधणी सुरू आहे. सोबतच बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे मार्केटींग करण्यासाठी यशस्वी प्रयत्न सुरू आहे. आर्थिक विकास महामंडळाकडून लोकसंचालित केंद्राची निर्मिती करण्यात आली. यातूनही महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळणार आहे. शहरी भागातील महिलांना संघटीत करण्यासाठी नागरी उपजीवीका अभियान राबविले जात असून स्लम एरियातील महिलांना एकत्रित करून महिलांचे संघटने उभे करण्याचे काम त्यांनी केले आहे.

ग्रामसभेत महिलांचा वरचष्मा
गावातील महिला ग्रामसभेत आपले प्रश्न मांडू लागल्या आहेत. आरोग्याच्या प्रश्नावर आशा स्वयंसेविका आणि आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टरांकडून उपचार करून घेण्यासाठी त्या पुढे येत आहे. बचत गटांमुळे त्यांच्यात जागृती निर्माण झाली आहे. यातूनच त्यांच्या कलाकुसरीला वाव मिळत आहे. शिवणकला, पार्लर, मेंदी क्लास, रांगोळी, नृत्यकला, संगीत असे विविध केंद्र गावात उभे राहात आहे. सोबतच गावातील रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी, स्वस्तधान्यावर महिला बोलू लागल्या आहेत. स्वच्छता अभियानातही त्यांचा पुढाकार आहे. गोदरीमुक्त गाव आणि दारूबंदीसाठी महिला एकत्र येत आहे.

Web Title: Thirty-six thousand women in Yavatmal district gathered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.