नेरच्या नराधमाला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 10:01 PM2018-06-18T22:01:54+5:302018-06-18T22:02:04+5:30

अल्पवयीन मुलगी घराकडे जात असताना नराधमाने तिचे अपहरण करून सलग सहा दिवस अत्याचार केला. या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्ष कारवासाची शिक्षा ठोठावली.

Ten years of continuous education for Ner's madness | नेरच्या नराधमाला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

नेरच्या नराधमाला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

Next
ठळक मुद्देअपहरण व अत्याचार : पीडितेची साक्ष निर्णायक

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अल्पवयीन मुलगी घराकडे जात असताना नराधमाने तिचे अपहरण करून सलग सहा दिवस अत्याचार केला. या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्ष कारवासाची शिक्षा ठोठावली.
गजानन देवराव राठोड (२२) रा. फुकटनगर नेर, असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. २७ जून २०१६ रोजी सकाळी ११ वाजता नेर येथील पीडित मुलगी वटफळी येथील स्वस्त धान्य दुकानात धान्य आणण्यासाठी जात होती. तिला नेरच्या शासकीय रुग्णालयाजवळ अडवून गजानन राठोडने तिचे अपहरण केले. आरोपीने तिला अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील लेहगाव येथे नेले. तेथे त्याने सलग सहा दिवस तिच्यावर अत्याचार केला. पीडितीने त्याच्या तावडीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न केल. मात्र त्यात ती अपयशी ठरले. अखेर २ जुलै २०१६ रोजी पीडित मुलीने त्याच्या तावडीतून स्वत:ची कशीबशी सुटका करून नेर गाठले.
नेर येथे घरी परत आल्यानंतर आई-वडिलांसमोर तिने आपबिती कथन केली. नंतर पालकांसह थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार सादर केली. पीडितेच्या तक्रारीवरून नेर पोलिसांनी अपहरण, अत्याचार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गजाननविरूद्ध गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विजय गराड यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते.
जिल्हा व सत्र न्यायाधीश टी.एस.अकाली यांनी या खटल्यात आठ साक्षीदार तपासले. त्यात पीडित मुलीची साक्ष अत्यंत निर्णायक ठरली. पीडितेची ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपी गजानन राठोड याला दहा वर्षांची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सहायक सरकारी वकील अरुण मोहोड यांनी युक्तीवाद केला. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून प्रकाश मेश्राम यांनी सहकार्य केले.

Web Title: Ten years of continuous education for Ner's madness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.