दारव्हा येथे बंजारा समाजाचा तीज उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:46 AM2017-08-23T00:46:36+5:302017-08-23T00:47:18+5:30
बंजारा तीज उत्सव समितीच्यावतीने येथील कवितानगर हनुमान मंदिर परिसरात तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : बंजारा तीज उत्सव समितीच्यावतीने येथील कवितानगर हनुमान मंदिर परिसरात तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजातील उपवधू मुली, स्त्रियांनी बंजारा समाजाची पारंपरिक गीते गावून कार्यक्रमात रंगत आणली.
सुरुवातीला हनुमान मंदिराजवळ समाज बांधव, भगिनी मोठ्या संख्येने जमा झाले. तेथील कार्यक्रमानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत पारंपरिक गीत आणि नृत्यामुळे चांगलाच रंग भरला. उत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला उत्सव समितीचे अध्यक्ष सुशिल राठोड, उपाध्यक्ष शंकर राठोड, सचिव डॉ.मनोज राठोड उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते तीज तोडून कार्यक्रमाची सांगता झाली. यशस्वीतेसाठी गजेंद्र चव्हाण, समाधान आडे, ताराचंद चव्हाण, अॅड.एस.एस. राठोड, अॅड.संजय चव्हाण, प्रा.गणेश जाधव, राम जाधव, अमोल चव्हाण, प्रा.शेखर राठोड, प्रा.किशोर राठोड, तुषार राठोड, प्रमोद चव्हाण, स्वप्नील राठोड, मोरेश्वर चव्हाण, दुषांत राठोड, भाऊ पवार आदींनी परिश्रम घेतले.