Success in the Bhima-Koregaon case closed | भीमा-कोरेगाव प्रकरणी बंद यशस्वी

ठळक मुद्देतणावपूर्ण शांतता : वणी, मारेगाव, झरी व पांढरकवड्यातही घटनेचे पडसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : भीमा-कोरगाव प्रकरणी भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत बुधवारी वणीसह मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात येऊन घटनेचा तिव्र निषेध नोंदविण्यात आला. तणावपूर्ण शांततेत हा बंद पार पडला. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता.
१ जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव आणि आजुबाजूच्या परिसरात नियोजित कट कारस्थान करून दंगली घडविणारे व त्यामागील सूत्रधारांना कडक शासन करण्यात यावे, या मागणीसाठी वणी शहरातील सर्व पुरोगामी व सामाजिक संघटनांच्यावतीने बुधवारी सकाळी ९ वाजता शहरात मोर्चा काढून बंदचे आवाहन करण्यात आले. शहरातील टिळक चौकातून काढण्यात आलेला हा मोर्चा खाती चौक, तुटी कमान चौक, टागोर चौक, गणेशपूर रोड, जलशुद्धीकरण केंद्र, महाराष्टÑ बँक चौक व तेथून चिखलगावजळील जिजाऊ चौकात पोहचला. तेथून हा मोर्चा परत फिरून शिवतिर्थ चौकात नेण्यात आला. तेथे सभा घेण्यात आली. या सभेत विविध संघटनांच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारी दोन वाजता सभेची सांगता झाली.
यादरम्यान, वणी शहरात रुग्णालये, मेडिकल, बँका वगळता व्यापाºयांकडून कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सकाळपासूनच सुटी जाहीर करण्यात आली. सायंकाळनंतरही शहरातील अनेक प्रतिष्ठाने बंद होती. या मोर्चात भारिप-बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, बहुजन समाज पार्टी, संभाजी ब्रिगेड, पिरिपा, आदिवासी जनजागृती युवा संघटना, भाकप, माकप, भारतीय मुस्लिम परिषद, मराठा सेवा संघ यासह विविध पुरागोमी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते.
मारेगावात उत्स्फूर्त प्रतिसाद
मारेगाव तालुक्यातील पुरोगामी विचारसरणीच्या विविध संघटनांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून रॅली काढण्यात आली. रॅलीद्वारे करण्यात आलेल्या बंदच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता व्यापाºयांनी कडकडीत बंद पाळला. शाळा-महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आलीत. या बंदचा प्रवासी वाहतुकीवरही परिणाम झाला. झरी येथेही विविध संघटनांच्यावतीने मोर्चा काढण्यात येऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
पांढरकवड्यात समिश्र प्रतिसाद
पांढरकवडा तालुक्यात बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील करंजी, मोहदा येथील बाजारपेठ १०० टक्के स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली. या ठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात आला. पांढरकवडातील बाजारपेठ मात्र सुरळीत सुरू होती. पांढरकवडा येथील राष्टÑीय महामार्गावरील वाय पॉइंटजवळ संभाजी ब्रिगेड व भारत मुक्ती सेनेच्यावतीने दुपारी १ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
वणी व पांढरकवड्यातील बससेवाही ठप्प
विविध संघटनांनी बंदची हाक दिल्याने बुधवारी सकाळी ९ वाजतानंतर वणी आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. सायंकाळी ५ वाजतानंतर मात्र बसेस सोडण्यात आल्या. बससेवा ठप्प झाल्याने वणी आगाराला अडीच लाख रुपयांचा फटका बसला. पांढरकवडा येथील


Web Title: Success in the Bhima-Koregaon case closed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.