दिग्रस तालुक्याला वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 09:33 PM2019-06-08T21:33:45+5:302019-06-08T21:34:57+5:30

सतत दोन दिवस तालुक्यात वादळाने थैमान घातले. गुरूवार व शुक्रवारी वादळाने तडाखा दिला. या वादळात ग्रामीण भागासह शहरी भागात मोठे नुकसान झाले. वादळामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेले.

Strike of Digras taluka | दिग्रस तालुक्याला वादळाचा तडाखा

दिग्रस तालुक्याला वादळाचा तडाखा

Next
ठळक मुद्देमोठे नुकसान । पिंपळाचे झाड कोसळले, तीन बालके जखमी, वीजपुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : सतत दोन दिवस तालुक्यात वादळाने थैमान घातले. गुरूवार व शुक्रवारी वादळाने तडाखा दिला. या वादळात ग्रामीण भागासह शहरी भागात मोठे नुकसान झाले.
वादळामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेले. येथील पशुवैद्यकीय कार्यालयाजवळील ताजनगरमधील जुने मोठे पिंपळाचे झाड मुळापासून उन्मळून पडले. हे झाड नासीर खान गफ्फार खान यांच्या घरावर कोसळले. यामुळे खान परिवार हादरून गेला. झाड घरावर कोसळल्याने ७ वर्षीय आनम फिरदोस, ५ वर्षीय नूरजहाँ आणि ६ वर्षीय सुलतान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. नासीर खान, समशादबी, आयेशा अंजुम, बिलाल हे किरकोळ जखमी झाले. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. गंभीर जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. झाड घरावर पडल्याने घराच्या भिंती, टिनपत्रे व घरातील साहित्याचे प्रचंड नुकसान झाले.
तालुक्यातील देऊरवाडी (पु.) येथील शारूक शे.महेमूद यांच्यासह ८ ते १० जणांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली. चिंचोली, कळसा, सावंगा बु, धानोरा, निंभा, विठोली, तुपटाकळी, कांदळी, महागाव, कलगाव, डेहणी, चिरकुटा, फुलवाडी, आरंभी, मोख, तिवरी, लाख रायाजी, साखरा, हरसूल, गांधीनगर, मांडवा, रोहणादेवी, आमला, खंडापूर, रामनगर, इसापूर, दत्तापूर, कोलुरा, साखरी, फेट्रीसह अनेक गावांत घरांवरील टिनपत्रे उडून गेली. अनेक झाडे कोसळली. विद्युत तारा तुटल्या. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता.
येथील जुन्या बसस्थानकावरील मोठ्या पिंपळाच्या झाडाच्या फांद्या तुटल्या. दिनबाई विद्यालयातील निंबाच्या झाडाच्या फांद्या तुटल्या. दिवाणी न्यायालयातील निंब, डॉ.आंबेडकर पुतळा परिसरातील निंबाचे झाड उन्मळून पडले. तहसील व पंचायत समिती परिसरात झाडे तुटली. यामुणे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

महसूल प्रशासनाला पंचनाम्याचे आदेश
तहसीलदार राजेश वझीरे यांनी वादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यासाठी महसूलचे खास पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक घटनास्थळी जाऊन पंचनामे करीत आहे. सर्व पंचनामे झाल्यानंतरच वादळाने झालेल्या नुकसानीचा खरा आकडा कळणार आहे. दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे दोन दिवस जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे मात्र नागरिकांना दिलासा मिळाला. तथापि रात्रभर वीज नसल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला.

Web Title: Strike of Digras taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस