बेंबळा जलवाहिनीचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:13 PM2018-01-19T23:13:45+5:302018-01-19T23:13:58+5:30

यवतमाळकरांना बेंबळा प्रकल्पावरून उन्हाळ्यात पाणी मिळण्याची आस लागलेली असताना अभियंता व फायनान्सरच्या वादात या पाईपलाईनचे कामच दोन आठवड्यांपासून बंद पडले आहे. ते पाहता एप्रिलपूर्वी खरोखरच बेंबळाचे पाणी मिळणार काय, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

Stop the work of the monkeys | बेंबळा जलवाहिनीचे काम बंद

बेंबळा जलवाहिनीचे काम बंद

Next
ठळक मुद्दे १५ दिवस लोटले : पाण्याचा एप्रिलचा मुहूर्त टळण्याची चिन्हे

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळकरांना बेंबळा प्रकल्पावरून उन्हाळ्यात पाणी मिळण्याची आस लागलेली असताना अभियंता व फायनान्सरच्या वादात या पाईपलाईनचे कामच दोन आठवड्यांपासून बंद पडले आहे. ते पाहता एप्रिलपूर्वी खरोखरच बेंबळाचे पाणी मिळणार काय, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा धरणातून यवतमाळपर्यंत पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी साडेपाचशे कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले. यातून यवतमाळ शहर व परिसरात पाण्याच्या १६ उंच टाकी बांधल्या जाणार आहे. मुख्य जलवाहिनी, उपजलवाहिन्या व शहरात सर्वत्र पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे जाळे नव्याने विणले जाणार आहे. जॅकवेल, फिल्टर प्लँट या कामांचाही त्यात समावेश आहे.
फिल्टर प्लँट, टाकी, पाईपलाईन हे मुख्य काम साडेतीनशे कोटींचे आहे. या कामांचे कंत्राट नाशिक येथील शासकीय कंत्राटदार पी.एल. अडके यांना मिळाले आहे. या कामात चौघे भागीदार आहेत. अडके यांना या कामासाठी हरियाणाच्या गौरवकुमार यांनी फायनान्स केले आहे. या कामावरील देखरेखीसाठी कंत्राटदाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता दिनेश बोरकर (कारंजा) यांची नियुक्ती केली आहे. या संपूर्ण कामाचे ड्रॉर्इंग व सुपरव्हीजन बोरकर यांचे आहे.
बेंबळा ते यवतमाळ या जलवाहिनीच्या कामासाठी फायनान्सर स्वत: यवतमाळात तळ ठोकून आहे. सद्यस्थितीत पाण्याच्या १६ टाकींचे २० टक्के बांधकाम झाले आहे. शहरात पाईपलाईन टाकण्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे. दोन आठवड्यांपूर्वी फायनान्सर गौरवकुमार आणि अभियंता बोरकर यांच्यात वाद झाला. त्यातूनच बोरकर दोन आठवड्यांपूर्वी काम सोडून गावाकडे निघून गेले. तेंव्हापासून पाणीपुरवठ्याचे हे काम बंद आहे.
बेंबळाचे पाणी एप्रिलपूर्वी यवतमाळात आणायचेच, यासाठी पालकमंत्री मदन येरावार यांची धडपड आहे. एक-एक दिवस महत्वाचा असल्याचे ते अधिकाºयांना सांगतात. तर दुसरीकडे आता १५ दिवसांपासून चक्क प्रमुख कामच बंद असल्याने मार्च-एप्रिलपर्यंत बेंबळाचे पाणी यवतमाळात येणार कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पालकमंत्र्यांकडून कंत्राटदाराची झाडाझडती
काम बंद असल्याची कुणकुण लागताच पालकमंत्री मदन येरावार यांनी कंत्राटदार अडके, फायनान्सर गौरव कुमार यांना बोलावून त्यांची झाडाझडती घेतली. वेळप्रसंगी काम काढून घेण्याची तंबीही त्यांना दिली.
सहा स्थानिक कंत्राटदार
बेंबळावरून पाणी आणण्याच्या मुख्य कामाचे तुकडे पाडून ते स्थानिक शकील, चव्हाण, समदूरकर, शर्मा, मांगूळकर, कुटे यांना देण्यात आल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Stop the work of the monkeys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.