उमरखेड येथे साकारणार तारांगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:17 PM2019-02-19T22:17:47+5:302019-02-19T22:18:15+5:30

अनेक मोठ्या शहरांप्रमाणेच आता उमरखेडमध्ये तारांगण उभारण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषद पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली. अनेक मोठ्या शहरांमध्ये अंतराळ अभ्यासासाठी तारांगण उभारण्यात आले आहे.

Starfish to reach Umarkhed | उमरखेड येथे साकारणार तारांगण

उमरखेड येथे साकारणार तारांगण

googlenewsNext
ठळक मुद्देपालिकेची माहिती : जगदंबा देवीच्या पायथ्याशी २० कोटींच्या निधीतून पर्यटन क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : अनेक मोठ्या शहरांप्रमाणेच आता उमरखेडमध्ये तारांगण उभारण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषद पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली.
अनेक मोठ्या शहरांमध्ये अंतराळ अभ्यासासाठी तारांगण उभारण्यात आले आहे. आता उमरखेडमध्येही अशाच प्रकारचे पाच कोटी रुपयांचे तारांगण उभारले जाणार आहे. त्यासाठी शासनस्तरावरून भरीव निधीची तरतूद करण्यात आली असून निविदासुद्धा काढण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. तारांगण उभारणीसाठी ४-के तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. ३५ फुटांचे अर्धगोलाकार घुमटाचे हे तारांगण वाताणुकुलीत राहणार आहे. या तारांगणात ७० जणांची आसनक्षमता राहणार आहे. अंतराळात बसून निरीक्षण करीत असल्याचा अनुभव येण्यासाठी ३६०-१८० अंशांचे घुमटामध्ये डोळ्यांना कोणतेही उपकरण न लावता त्रिमितीय रूपात अंतराळातील घडामोडी बघता येणार आहे. परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. त्यांना अंतराळ अभ्यास करण्यास मदत मिळणार आहे, असे नगराध्यक्ष नामदेव ससाने यांनी सांगितले.
पालिकेने शहर विकासाची अनेक कामे पूर्णत्वास नेली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन बाळगला जात असल्याचे नितीन भुतडा यांनी सांगितले. विकास कामांसाठी पालकमंत्री मदन येरावार, आमदार राजेंद्र नजरधने यांच्या पाठपुराव्यामुळे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. जगदंबा देवीच्या पायथ्याशी असलेल्या अविकसित जागेत सुमारे २० कोटी रुपये खर्च करून पर्यटन क्षेत्र निर्माण करण्याचा मानसही यावेळी व्यक्त करण्यात आला.
पत्रकार परिषदेला नगरसेवक राजू जयस्वाल, दिलीप सुरते, प्रकाश दुधेवार आदी उपस्थित होते.
४० फुटांच्या मनोऱ्यावर दुर्बिन
रात्री अंतराळ निरीक्षणासाठी यंत्रणा उभारली जाणार आहे. त्यासाठी ४० फूट उंच मनोºयावर संगणकीय अत्याधुनिक दुर्बिन लावली जाणार आहे. यामुळे आकाशातील ग्रह, तारे, विविध घटकांचे निरीक्षण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय जगदंबादेवी पायथ्याशी आरक्षण क्र. ५ वर पिकनिक स्पॉट विकसित केला जाणार आहे.

Web Title: Starfish to reach Umarkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.