पोटगव्हाण जवळ धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 09:21 PM2019-04-21T21:21:21+5:302019-04-21T21:21:55+5:30

मानव विकास मिशनच्या धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याचा प्रकार रविवारी सकाळी पोटगव्हाण गावाजवळ घडला. बसची गती कमी असल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला. मात्र या घटनेने एसटीच्या यंत्र विभागाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

The stairing rod of the bus running near Patgwah broke | पोटगव्हाण जवळ धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटला

पोटगव्हाण जवळ धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मानव विकास मिशनच्या धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याचा प्रकार रविवारी सकाळी पोटगव्हाण गावाजवळ घडला. बसची गती कमी असल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला. मात्र या घटनेने एसटीच्या यंत्र विभागाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
रविवारी सकाळी ६ वाजता कळंब-पोटगव्हाण-कळंब ही एमएच ०७-९४३७ या क्रमांकाची बस मार्गावर निघाली. दरम्यान, पोटगव्हाण या गावाजवळ स्टेअरिंग रॉड तुटून पडला. यामुळे एसटीची समोरील चाके नियंत्रणाबाहेर गेली. पोटगव्हाण रस्त्याचे काम सुरू असल्याने या बसची गती कमी होती. चालकाने समयसूचकता दाखवत बस नियंत्रणात आणली. गती अधिक असती तर मोठा अपघात झाला असता, असे सांगितले जाते. मात्र रॉड तुटल्याचे कळताच प्रवाशांना धक्का बसला.
बस सुस्थितीत आहे, असा यंत्र विभागाचा शिक्का बसल्यानंतरच मार्गावर नेली जाते. मात्र या विभागाची चालढकल सुरू आहे. थातूरमातूर कामे केली जात आहे. परिणामी मार्गात ब्रेकडाऊन झाल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. चांगल्या स्थितीतील बसेसच मार्गावर जाव्या यासाठी आगार पातळीवरील प्रमुख अधिकाऱ्यांकडून प्रयत्न होत आहे. मात्र यासाठी त्यांना सर्वांची साथ मिळत नसल्याची ओरड आहे. याचा परिणाम यंत्र विभागातील कामांवर होत आहे. त्रास मात्र प्रवाशांना सहन करावा लागत आहे. पोटगव्हाणसारख्या गंभीर घटनाही घडत आहे. विभाग नियंत्रक अविनाश राजगुरे यांना यंत्र विभागातील व्यवस्थापनाचा दीर्घ अनुभव आहे. याचा फायदा सुस्थितीतील बसेस मार्गावर धावण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा लोकवाहिनीच्या दैवताला (प्रवासी) आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: The stairing rod of the bus running near Patgwah broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.