बेलोरा घाटावर रात्री एसडीओंची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 09:44 PM2019-05-07T21:44:24+5:302019-05-07T21:44:52+5:30

तालुक्यातील बेलोरा घाटावर सोमवारी रात्री वणीचे एसडीओ व तहसीलदारांनी संयुक्तरीत्या धाड घातली. यावेळी बेकायदेशीररीत्या सदर घाटावर रात्रीच्यावेळी पोकलँडद्वारे रेतीचा उपसा केला जात असल्याचे आढळून आल्यानंतर महसूल विभागाच्या या अधिकाऱ्यांनी घाटावर असलेले चार ट्रक व दोन पोकलँड मशीन ताब्यात घेऊन शिरपूर पोलीस ठाण्यात लावले.

Soldiers of SDO at Belora Ghat on night | बेलोरा घाटावर रात्री एसडीओंची धाड

बेलोरा घाटावर रात्री एसडीओंची धाड

Next
ठळक मुद्देरात्रभर चालली कारवाई : दोन पोकलॅन्ड, चार ट्रक जप्त, सूर्यास्तानंतर उपसा

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : तालुक्यातील बेलोरा घाटावर सोमवारी रात्री वणीचे एसडीओ व तहसीलदारांनी संयुक्तरीत्या धाड घातली. यावेळी बेकायदेशीररीत्या सदर घाटावर रात्रीच्यावेळी पोकलँडद्वारे रेतीचा उपसा केला जात असल्याचे आढळून आल्यानंतर महसूल विभागाच्या या अधिकाऱ्यांनी घाटावर असलेले चार ट्रक व दोन पोकलँड मशीन ताब्यात घेऊन शिरपूर पोलीस ठाण्यात लावले. या कारवाईने रेती व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील बेलोरा येथील रेती घाटाचा लिलाव झाला. हा घाट वर्धा जिल्ह्यातील एका कंत्राटदाराने घेतल्याची माहिती आहे. या घाटावरून दिवसरात्रं रेतीचा उपसा होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. या तक्रारीवरून जिल्हाधिकाºयांनी वणीचे एसडीओ जावळे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास एसडीओ जावळे, वणीचे तहसीलदार श्याम धनमने व तलाठी तथा महसूल कर्मचाºयांनी बेलोरा घाटावर अचानक धाड टाकली. त्यावेळी या घाटावरून पोकलँडद्वारे रेतीचा उपसा केला जात असल्याचे दिसून आले. नियमानुसार सुर्यास्तानंतर घाटावरून रेतीचा उपसा करता येत नाही. तसेच उपसा करताना कुठल्याही यंत्राचा वापर करू नये, असा नियम आहे. परंतु हा नियम पायदळी तुडवून रेतीचा उपसा केला जात असल्याची बाब उघडकीस आली.
एसडीओ जावळे व तहसीलदार श्याम धनमने यांनी रेती घाटावर असलेल्या दोन पोकलँड मशीन व चार ट्रक जप्त करून ते शिरपूर पोलीस ठाण्यात जमा केले. अद्याप याप्रकरणी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार झाली नसून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती तहसीलदार श्याम धनमने यांनी ‘लोकमत’ला दिली. वणी तालुक्यात बेलोरा येथील केवळ एकाच घाटाचा लिलाव झाला आहे. या ठिकाणाहून अधिकृतपणे रेतीचा उपसा सुरू आहे. मात्र नियम डावलून रेतीचा उपसा होत असल्याने संबंधित कंत्राटदार चांगलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे. याप्रकरणात गुरूवारी कारवाई होणार असल्याची माहिती धनमने यांनी दिली.
अन्य रेतीघाटावरूनही शेकडो ब्रास रेतीची चोरी
वणी तालुक्यातील अन्य रेती घाटाचे लिलाव झाले नसले तरी काही रेती तस्कर महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ झोकून शेकडो ब्रास रेती लंपास करीत असल्याचे चित्र वणी तालुक्यात दिसत आहे. त्यामुळे हजारो रूपयांचा शासनाचा महसूल बुडत आहे. सोबतच पर्यावरणाचादेखील मोठ्या प्रमाणावर ºहास होत आहे. या रेती तस्करांच्या मुसक्या आवळ्याचे मोठे आव्हान महसूल विभागापुढे आहे.

Web Title: Soldiers of SDO at Belora Ghat on night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू