उमर्डा नर्सरीजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:41 PM2018-04-18T23:41:18+5:302018-04-18T23:41:18+5:30

भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा बछडा ठार झाल्याची घटना यवतमाळ-दारव्हा मार्गावरील उमर्डा नर्सरीजवळ मंगळवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. वन विभागाने बछड्याचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार केले.

 A scare of a leopard struck near the Umda nursery | उमर्डा नर्सरीजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार

उमर्डा नर्सरीजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार

Next
ठळक मुद्देरस्ता ओलांडताना घात : शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा बछडा ठार झाल्याची घटना यवतमाळ-दारव्हा मार्गावरील उमर्डा नर्सरीजवळ मंगळवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. वन विभागाने बछड्याचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार केले.
यवतमाळ-दारव्हा मार्गावर उमर्डा नर्सरी परिसरात राखीव वन आहे. निर्जन परिसर असून या जंगलात मोठ्या प्रमाणात वन्यजीव आहे. जंगलातील जलस्रोत आटल्याने प्राणी रस्ता ओलांडून जामवाडी तलावाकडे जातात. मंगळवारी रात्री बिबट बछडा रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात तो जागीच ठार झाला. हा प्रकार वन चौकीदाराच्या लक्षात आला. त्याने रात्रीच वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली. घटनास्थळावर वन विभागाचे अधिकारी पोहोचले. सदर बछडा चार ते पाच महिन्याचा असून तो नर जातीचा होता. वन विभागाने बिबट बछड्याला ताब्यात घेऊन यवतमाळात आणण्यात आले. पशुचिकित्सालयाच्या डॉक्टरांनी बछड्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर सहायक वनसंरक्षक गिरीजा देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रिया गुल्हाने, वाईल्ड लाईफ वॉर्डन श्याम जोशी, वनपाल संजय माघाडे, वनरक्षक लहाडके आदींच्या उपस्थितीत बछड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उमर्डा जामवाडी परिसरातून जाणाऱ्या राज्य मार्गावर वाहने भरधाव असतात. तर पाण्याच्या शोधात वन्यजीव रस्ता ओलांडतात. अशा वेळी वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात येतो. चालकांनी आपल्या वाहनाची गती कमी ठेऊन प्रथम वन्य प्राण्यांना रस्ता ओलांडू द्यावा, वन्यजीव अबाधित ठेवण्यासाठी ही दक्षता घ्यावी.
- गिरीजा देसाई,
सहायक वनसंरक्षक, यवतमाळ

Web Title:  A scare of a leopard struck near the Umda nursery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ