सागवानाची तेलंगणात तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 10:42 PM2018-04-22T22:42:04+5:302018-04-22T22:42:04+5:30

तालुक्यात मौल्यवान सागवान तसेच इतर वृक्षांची मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असून शेजारच्या तेलंगणा राज्यात या सागवानाची तस्करी होत आहे. पांढरकवडा तालुका हा चारही बाजूंनी जंगलाने व्यापलेला तालुका असून याच तालुक्यात टिपेश्वर अभयारण्यसुद्धा आहे.

Sagavana smuggled in Telangana | सागवानाची तेलंगणात तस्करी

सागवानाची तेलंगणात तस्करी

Next
ठळक मुद्देरात्री अवैध वृक्षतोड : गस्तीच्या नावावर केवळ फेरफटका

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : तालुक्यात मौल्यवान सागवान तसेच इतर वृक्षांची मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असून शेजारच्या तेलंगणा राज्यात या सागवानाची तस्करी होत आहे.
पांढरकवडा तालुका हा चारही बाजूंनी जंगलाने व्यापलेला तालुका असून याच तालुक्यात टिपेश्वर अभयारण्यसुद्धा आहे. या जंगलात सागवानासह विविध मौल्यवान वृक्ष आहेत. सध्या तेलंगणातील तस्करांचा या वनसंपदेवर डोळा असून या तस्करीला स्थानिकांचा हातभार लागत आहे. ही तस्कर मंडळी स्थानिकंच्या मदतीने रात्रीच्यावेळी मोठमोठ्या सागवान वृक्षाची कत्तल करतात व रातोरात तेलंगणा राज्यात वाहनांद्वारे हे मौल्यवान लाकुड सीमापार करतात. वाहन सीमापार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण होते. अनेक तस्करांजवळ स्वयंचलित आरामशीन असून या आरामशिनद्वारे अवघ्या काही मिनीटताच सागवानाचे मोठे झाडही कापल्या जाते. या सागवानाचे तुकडे करून वाहनात भरून त्यावर गौण खनिज अथवा वैरण किंवा खाली बारदाणा टाकून तेलंगणात नेले जाते. मध्यंतरी दोन सागवान तस्करांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर सागवान जप्त करण्यात आले होते. परंतु नंतर या प्रकरणाचे काय झाले, याबाबत काहीही समजले नाही.
एकीकडे शासन वृक्ष लागवड करण्याच्या विविध योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे सागवान तस्कर अवैधरितीने मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करीत आहे. या वृक्षतोडीमुळे वनसंपदा नष्ट होत आहे.
अनेकदा हे सागवान तस्कर सागवान तोडीच्या नावाखाली वन्यप्राण्यांची शिकारदेखिल करतात. जंगलात कुणीही फेरफटका मारला असता, सागवान झाडाची कत्तल झाल्याचे दिसून येते. सागवानाची तुटलेली थुटे दिसून येते. पंरतु वनविभागाला ही वृक्षतोड दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सर्रास सुरू आहे. परंतु याकडे वनविभाग लक्ष द्यायला तयार नाही. वृक्षप्रेमी व वन्यप्रेमी म्हणून स्वत:चा उदोउदो करणारेही या वृक्षतोडीबाबत चुप्पी साधून आहे. केवळ वृक्षारोपणाच्या नावाखाली प्रसिद्धी मिळविणाऱ्या या स्वयंघोषित वृक्षप्रेमींनी व वन्यप्रेमी मंडळींनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
तपासणी नाके केवळ फार्स
सागवान तस्करीला आळा घालण्यासाठी वनविभागाने ठिकठिकाणी वनउपज तपासणी नाके उभारले आहेत. परंतु हे नाके केवळ शोभेसाठी बनले की काय, असा प्रश्न निर्माण होतो. काही अपवाद जर सोडला, तर या नाक्यावर रात्रीच्यावेळी एकही कर्मचारी दिसत नाही. याच संधीच लाभ घेत तस्कर कटाई केलेला सागवान माल वाहनाद्वारे नेत आहे. वनअधिकारी, कर्मचाºयांचे साटेलोटे असल्यामुळेच हे शक्य असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Sagavana smuggled in Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल