‘जय शिवराय’च्या गजराने पुष्पावंतीनगरी दुमदुमली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:20 PM2019-02-19T22:20:52+5:302019-02-19T22:22:22+5:30

येथील छत्रपती शिवाजी चौकात मंगळवारी शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. मात्र सायकल रॅली व शोभायात्रा रद्द करून पुलवामा हल्ल्यातील शहीदवीरांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Pushpavantnagari Dumdumli with the alarm of 'Jai Shivrai' | ‘जय शिवराय’च्या गजराने पुष्पावंतीनगरी दुमदुमली

‘जय शिवराय’च्या गजराने पुष्पावंतीनगरी दुमदुमली

Next
ठळक मुद्देशहिदांना सामूहिक श्रद्धांजली : शिवप्रेमींची लक्षणीय उपस्थिती, हल्ल्याचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : येथील छत्रपती शिवाजी चौकात मंगळवारी शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. मात्र सायकल रॅली व शोभायात्रा रद्द करून पुलवामा हल्ल्यातील शहीदवीरांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पूर्णाकृती पुतळ्याचे आमदार मनोहरराव नाईक, नगराध्यक्ष अनिताताई नाईक यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांनी जय जिजाऊ-जय शिवरायांच्या घोषणा दिल्या. या घोषणांनी पुष्पावंतीनगरी दुमदुमून गेली. छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीतर्फे पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम झाला. शिवपूजन सोहळ्याला आमदार अ‍ॅड. नीलय नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, अ‍ॅड. आशिष देशमुख, वसंतराव पाटील, डॉ. अकील मेमन, डॉ. मो. नदीम, महेश खडसे, दीपक आसेगावकर, दिगांबर जगताप आदी उपस्थित होते.
जन्मोत्सव समितीने शिवजयंतीनिमित्त शहरातील प्रमुख मार्गाने सायकल रॅली व सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात ४४ भारतीय जवान शहीद झाल्याने हे कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्याऐवजी शहिदांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी श्रीकांत सरनाईक, अ‍ॅड. उमेश चिद्दरवार, वर्षा पाटील, शुभांगी पानपट्टे, रुपाली पवार, डॉ. जय भोपी, निशांत बयास, राजू दुधे, अ‍ॅड. महेश निर्मळ, अ‍ॅड. उमाकांत पापीनवार यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, पुसद चेंबर आॅफ कॉमर्स, पुसद अर्बन बँक व विविध संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Pushpavantnagari Dumdumli with the alarm of 'Jai Shivrai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.