पुसद विभागाला १६ कोटींचा पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 10:08 PM2018-07-18T22:08:26+5:302018-07-18T22:08:58+5:30

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुसद विभागात येणाऱ्या पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यातील शाखेत शेतकऱ्याचे पीक विम्याचे १६ कोटी तीन लाख तीन हजार रूपये जमा झाले.

Pusad Section gets Crop Insurance of Rs. 16 Crore | पुसद विभागाला १६ कोटींचा पीक विमा

पुसद विभागाला १६ कोटींचा पीक विमा

Next
ठळक मुद्देपॅनकार्डच्या सक्तीमुळे शेतकऱ्यांमध्ये रोष : पोफाळी येथील जिल्हा बँकेसमोर शेतकऱ्यांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुसद विभागात येणाऱ्या पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यातील शाखेत शेतकऱ्याचे पीक विम्याचे १६ कोटी तीन लाख तीन हजार रूपये जमा झाले. मात्र पॅनकार्ड नसणाऱ्या शेतकऱ्यांना विमयची रक्मे मिळणे अवघड झाले आहे. त्यांना परत पाटविले जात असल्याने शेतकऱ्यांमधये प्रचंड असंतोष खदखदत आहे.
पुसद विभागातील जिल्हा बँकेच्या शाखेत पीक विम्याचे पैषसे जमा झाले. गेल्यावर्षी विमा कंपनीकडे पुसद विभागातील हजारो शेतकºयांनी विमा हप्ता भरला होता. पुसद विभागात जिल्हा बँकेच्या १७ शाखा आहेत. त्यात पुसद, बेलोरा, गौळ, जांबबाजार, काकडदाती, शेंबाळपिंपरी, उमरखेड, ढाणकी, मुळावा, साखरा, पोफाळी, चिखली, महागाव, काळी दौ., पिपळगाव, हिवरा, फुलसंवगी यांचा समावेश आहे. यापैकी नऊ शाखेत विम्याचे १६ कोटी जमा झाले. ही रक्कम काढण्यासाठी शेतकरी बँकेकडे धाव घेत आहे. मात्र बँक शेतकºयांना पॅनकार्ड मागत आहे. पॅनकार्ड खात्याला लिंक असले, तरच पैसे विड्राल होत आहे.
या तिही तालुक्यात पॅनकार्डधारक शेतकरी अत्यंत कमी आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना पैसे मिळणे दुर्लभ झाले आहे. जिल्हा बँकेने पॅनकार्डची सक्ती केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. हक्काचे पैसे असूनही ते मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा बँकेने याबाबत शेतकरी हिताचे धोरण स्वीकारून सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. त्यासाटी वरिष्ठांकडे लक्ष लागले आहे.
१७ शाखांमध्ये शेतकऱ्यांना त्रास
पुसद विभागातील पुसद, महागाव आणि उमरखेड तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जवळपास १७ शाखा आहेत. या सर्वच शाखांनी विम्याची मदत मिळण्यासाठी पॅनकार्डची सक्ती केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. या शाखेत दोन कोटी १८ लाख रुपये जमा झाले. मात्र पोफाळी, दिवट पिंपरी, पळशी, अंबाळी, कळमुला, तरोडा, गगनमाळ, कुपटी येथील सुमारे दोन हजार शेतकºयांकडे पॅनकार्ड नाही. केवळ ३०० पॅनकार्डधारक शेतकऱ्यांनाच विम्याचा लाभ मिळाला. उर्वरित शेतकरी अद्यापही वंचित आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते उघडताना व ज्या ग्राहकांचे खाते बँकेत आहे, त्यांना पैसे काढण्यासाठी पॅनकार्ड लिंक करणे आवश्यक आहे. ज्यांचे पॅनकार्ड लिंक आहे, त्यांना वाटप सुरू आहे. ग्राहकांनी तत्काळ पॅनकार्ड काढणे जरुरी आहे.
- डी .सी . राठोड
पुसद विभाग प्रमुख
जिल्हा मध्यवर्ती बॅक

Web Title: Pusad Section gets Crop Insurance of Rs. 16 Crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.