ठळक मुद्दे११ प्रवासी उपचारासाठी रुग्णालयात दाखल

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ- पुण्याहून नागपूरकडे येत असलेल्या सतलज या खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची बस दारव्हा घाटात अपघातग्रस्त झाली. ही घटना शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. यात कुठलीच जिवीतहानी झाली नसून, प्रवाशांना गंभीर ते किरकोळ स्वरुपाच्या जखमा झाल्याचे वृत्त आहे. ११ प्रवाशांना यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल केले आहे.