नेर, उमरखेडमध्ये जनसुविधा केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 10:05 PM2017-12-17T22:05:53+5:302017-12-17T22:08:33+5:30

शासनाच्या योजनेनुसार जिल्ह्यातील उमरखेड व नेर येथे राज्य मार्गावर प्रवाशांसाठी खास जनसुविधा केंद्र उभारले जाणार आहे.

Public utility center in Ner, Umarkhed | नेर, उमरखेडमध्ये जनसुविधा केंद्र

नेर, उमरखेडमध्ये जनसुविधा केंद्र

Next
ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम : ‘एचपीसीएल’वर जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासनाच्या योजनेनुसार जिल्ह्यातील उमरखेड व नेर येथे राज्य मार्गावर प्रवाशांसाठी खास जनसुविधा केंद्र उभारले जाणार आहे.
राज्यात भाजप-सेना युती सरकार स्थापन झाल्यानंतर बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महामार्गावर प्रत्येक ५० किलोमीटरवर प्रसाधनगृह, जनसुविधा केंद्र उभारण्याची घोषणा केली होती. या घोषणेची अंमलबजावणी यवतमाळ जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. नेर आणि उमरखेड येथे जनसुविधा केंद्र उभारले जाणार आहे.
त्यासाठी शक्यतोवर सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा उपलब्ध करून दिली जाईल. ती नसल्यास खासगी व्यक्तीकडून जागा खरेदी केली जाणार आहे. ‘एचपीसीएल’ या कंपनीमार्फत हे जनसुविधा केंद्र उभारले जाणार आहे. तेथे अत्यावश्यक वस्तू विक्रीचे स्टॉलही राहणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
महामार्गावर जनसुविधा केंद्र सुरू होणार असल्याने या मार्गाने लांब पल्ल्याचा प्रवास करणाºयांना प्रसानधनगृहाची सुविधा उपलब्ध होणार आहे. शिवाय लांब प्रवासाला जाताना ठिकठिकाणी खाद्य वस्तू मिळण्याची सोय होणार आहे.

Web Title: Public utility center in Ner, Umarkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.