पंतप्रधानांचा यवतमाळातील महिलांशी थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 11:15 AM2018-06-06T11:15:40+5:302018-06-06T11:15:50+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी यवतमाळ जिल्ह्यातील घरकूल लाभार्थी महिलांशी व्हीसीच्या माध्यमातून थेट संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रत्यक्ष पंतप्रधानांशी बोलायला मिळाल्याने या महिलांनी आनंद व्यक्त केला.

Prime Minister's direct interaction with Yavatmal women | पंतप्रधानांचा यवतमाळातील महिलांशी थेट संवाद

पंतप्रधानांचा यवतमाळातील महिलांशी थेट संवाद

Next
ठळक मुद्देघरकूल लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीसीद्वारे चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी यवतमाळ जिल्ह्यातील घरकूल लाभार्थी महिलांशी व्हीसीच्या माध्यमातून थेट संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रत्यक्ष पंतप्रधानांशी बोलायला मिळाल्याने या महिलांनी आनंद व्यक्त केला.
प्रधानमंत्री आवास (शहरी व ग्रामीण) योजनेअंतर्गत घरकूल मिळालेल्या उमरखेड नगरपालिका क्षेत्रातील १४ आणि विविध ग्रामीण भागातील १८ अशा ३२ घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांचा राष्ट्रीय सूचना केंद्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत थेट संवाद घडून आला. यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, नगरपालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी, म्हाडाचे उपअभियंता डी.बी. साळुंके उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान म्हणाले, घर केवळ चार भिंतींनी उभे होत नाही, त्याला घरपण देण्याचे काम कुटुंबाचे आहे. आपले घर स्वच्छ व चांगले ठेवणे गरजेचे आहे. मुलांना शिक्षण द्या, त्यांच्या आरोग्यावर लक्ष द्या, पाण्याचा काटकसरीने वापर करा, असे मार्गदर्शन त्यांनी महिलांना केले.
उमरखेड नगरपालिका क्षेत्रातील विमल रावते, गंगासागर घोडे, वनिता जाधव, पूजा बारे, सपना चौधरी, ज्योती कोडगीरवार, दिलीप नंदनवार, ज्योती जिल्हेवार, उषा कामारकर, बंडू कुमरे, पूजा चेके, शंकर रावते, दीपक पोफळकर, आरती मलकेवार यांच्यासह चिकणी डोमगा येथील ललिता जगताप, इंद्रठाणाच्या सुमन कुडवे, पाथ्रडचे गोपाळ मेश्राम, अकोलीच्या नंदा बेटकर, बिटरगाव येथील किशोर विणकरे, रुखमाबाई दसरवाड, वडगावच्या ममता देठे, आकपुरीच्या सुमन पेंदोर, अनिता पुरके, उंदरणी येथील अश्विनी आत्राम, दिलीप ठाकरे, चांदापूर येथील राजू घारेकर, कोठाच्या लक्ष्मी तेलंग, मालनबी शेख, रेखा टेकाम, रोहडा येथील विठ्ठल नागुलकर, अरुण खिल्लारे, लोणी येथील समाधान चिरमाडे यांचा समावेश होता. या सर्वांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

पंतप्रधानांनी दखल घेतल्याचा आनंद
प्रधानमंत्री आवास योजनेची लाभार्थी ठरलेली उमरखेड नगरपरिषद ही जिल्ह्यातील एकमेव होय. ही किमया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री मदन येरावार यांच्यामुळे साध्य झाली. सदर योजना यशस्वीरीत्या राबविली जात असून उमरखेड शहरातील लाभार्थ्यांशी थेट पंतप्रधानांनी संवाद साधल्याचा आनंद झाला, असे उमरखेडचे नगराध्यक्ष नामदेव ससाने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Prime Minister's direct interaction with Yavatmal women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.