पंतप्रधान शनिवारी पांढरकवडामध्ये येणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 01:57 PM2019-02-15T13:57:32+5:302019-02-15T14:04:22+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा येथील नियोजित महिला मेळाव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या दिल्ली स्थित कार्यालयातील अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला ही माहिती दिली.

The Prime Minister will be in Pandharkaoda yavatmal on Saturday | पंतप्रधान शनिवारी पांढरकवडामध्ये येणार 

पंतप्रधान शनिवारी पांढरकवडामध्ये येणार 

googlenewsNext
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा येथील नियोजित महिला मेळाव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.सुरक्षा यंत्रणेने मोदींच्या दौऱ्याची जोरदार तयारी केली आहे. पाच हेलिपॅड बनविण्यात आले आहे. २८ एकर जागेत महिला मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे.

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा येथील नियोजित महिला मेळाव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या दिल्ली स्थित कार्यालयातील अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला ही माहिती दिली. जम्मू काश्मिरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पंतप्रधान मोदी पांढरकवड्यात येणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र मोदी येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने तर्कविर्तकांना पूर्णविराम मिळाला आहे.

सुरक्षा यंत्रणेने मोदींच्या दौऱ्याची जोरदार तयारी केली आहे. साडेचार हजारांवर पोलीस पांढरकवडा येथे तैनात आहेत. पाच हेलिपॅड बनविण्यात आले आहे. २८ एकर जागेत महिला मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. बचत गटाच्या सुमारे ३ लाख महिला या मेळाव्याला उपस्थित राहतील, असा दावा भाजपाकडून केला जात आहे. या मेळाव्याला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अनेक मंत्री, भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

Web Title: The Prime Minister will be in Pandharkaoda yavatmal on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.