उमरखेडमधील १३ गावांतील वीज समस्या लवकर सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 10:33 PM2019-07-05T22:33:58+5:302019-07-05T22:34:25+5:30

तालुक्यातील १३ गावांमधील वीज समस्या येत्या १५ दिवसात निकाली काढण्याची ग्वाही वीज वितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी दिली. तालुका सरपंच संघटनेने या समस्यांबाबत उपोषण सुरू केले होते. सरपंचांशी चर्चा करताना मडावी यांनी ही ग्वाही दिली.

The power problem of 13 villages in Umarkhed will be available soon | उमरखेडमधील १३ गावांतील वीज समस्या लवकर सुटणार

उमरखेडमधील १३ गावांतील वीज समस्या लवकर सुटणार

Next
ठळक मुद्देअधीक्षक अभियंत्यांची ग्वाही : सरपंच उपोषणानंतर तोडगा

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यातील १३ गावांमधील वीज समस्या येत्या १५ दिवसात निकाली काढण्याची ग्वाही वीज वितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी दिली. तालुका सरपंच संघटनेने या समस्यांबाबत उपोषण सुरू केले होते. सरपंचांशी चर्चा करताना मडावी यांनी ही ग्वाही दिली.
तालुक्यातील मरसूळ, सुकळी, बारा, कुपटी, तिवडी, बेलखेड, संगम-चिंचोली, लिंबगव्हाण आदी १३ गावांमध्ये वीज समस्या निर्माण झाली आहे. वारंवार वीज गूल होत असल्याने नागरिकांना अंधारात रहावे लागत आहे. गेल्या महिन्यातील वादळानंतर ही समस्या आणखी जटील झाली. वारंवार वीज पुरवठा खंडित व विस्कळीत होत असल्याने अखेर तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्ष सविता कदम यांच्या नेतृत्वात महावितरणसमोर उपोषण सुरू केले.
सरपंचांच्या उपोषणाची दखल घेत वीज वितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी, कार्यकारी अभियंता आडे, शहर अभियंता गेडाम, भाजप नेते नितीन भुतडा आदींनी शुक्रवारी विश्रामगृहात सरपंच संघटनेसोबत चर्चा केली. या चर्चेत सरपंच सविता कदम, सुमन बेंडके, शिवाजी रावते, रामराव नरवाडे, राजेश नलावडे, निर्मला हिंगाडे, सुदर्शन ठाकरे, प्रशांत पत्तेवार, अ‍ॅड. बळीराम मुटकुळे आदी सहभागी होते.

मरसूळच्या ३३ केव्ही केंद्राला गती देणे, नवीन डीपी बसविणे, सिंगल फेजचा पुरवठा सुरू करणे, वाढीव कर्मचारी देणे, विस्कळीत वीज पुरवठा तातडीने निकाली काढण्याचा निर्णय चर्चेत घेण्यात आला.

Web Title: The power problem of 13 villages in Umarkhed will be available soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज