तलावातील गाळ बळीराजाच्या शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 09:45 PM2018-04-25T21:45:48+5:302018-04-25T21:45:48+5:30

तालुक्यातील सावळी सदोबा येथे तलावातील गाळ उपसा करण्यास सुरूवात झाली आहे. ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत विकासगंगा संस्था घाटंजी व केअरिंग फ्रेंड्स मुंबई यांच्या सहकार्याने समर्पण बहुद्देशीय संस्था यवतमाळच्या पुढाकारात गाळ उपसा सुरू करण्यात आला.

The pond mud in the fields of the poor | तलावातील गाळ बळीराजाच्या शेतात

तलावातील गाळ बळीराजाच्या शेतात

googlenewsNext
ठळक मुद्देसावळीत काम : गाळमुक्त तलाव-गाळयुक्त शेत उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तालुक्यातील सावळी सदोबा येथे तलावातील गाळ उपसा करण्यास सुरूवात झाली आहे.
‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत विकासगंगा संस्था घाटंजी व केअरिंग फ्रेंड्स मुंबई यांच्या सहकार्याने समर्पण बहुद्देशीय संस्था यवतमाळच्या पुढाकारात गाळ उपसा सुरू करण्यात आला. सावळीच्या सरपंच अंजना गेडाम, जलसंधारण विभागाचे अभियंता खडसे, सुनयना यवतकर, समर्पण संस्थेचे रणजित बोंबले, विकासगंगा संस्थेचे नीलेश खंदार, महम्मद सर्वे तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत गाळ उपसा सुरू करण्यात आला.
याप्रसंगी शेतकºयांना मार्गदर्शन करताना सुनयना यवतकर म्हणाल्या, राज्य सरकारने शेतकºयांना दिलासा मिळावा म्हणून गाळमुक्त धरण व गाळयुक्त शेत हा उपक्रम सुरू केला. या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा म्हणून संस्थेतर्फे शेतकºयांची जमीन सुपिक व्हावी या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला. तलावातील गाळ शेकडो शेतकरी आपल्या शेतात नेत आहे. या गाळामुळे शेताची सुपिकता वाढण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी स्वत:हून गाळ नेत असल्याचे दिसून येते.

Web Title: The pond mud in the fields of the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.