पैनगंगा तीरावरील गावे संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:25 AM2018-11-18T00:25:45+5:302018-11-18T00:26:25+5:30

रब्बी सिंचनासाठी पैनगंगा नदीत पाणी सोडावे, या मागणीसाठी १९ नोव्हेंबरपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी बोरी (चातारी) येथील पात्रात धरणे आंदोलन करणार आहे.

Panganga Terra villages are in trouble | पैनगंगा तीरावरील गावे संकटात

पैनगंगा तीरावरील गावे संकटात

googlenewsNext
ठळक मुद्देनदी कोरडी : शेतकरी, नागरिकांचा एल्गार, १९ नोव्हेंबरपासून नदी पात्रात धरणे

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : रब्बी सिंचनासाठी पैनगंगा नदीत पाणी सोडावे, या मागणीसाठी १९ नोव्हेंबरपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी बोरी (चातारी) येथील पात्रात धरणे आंदोलन करणार आहे.
पैनगंगा नदीवर धरण बांधले तेव्हापासून नदी काठच्या ९० गावांवर मोठे संकट ओढवले आहे. केवळ पावसाळ्यात नदीला पाणी असते. उर्वरित वर्षभर नदी पात्र ठणठणीत राहाते. धरण होण्यापूर्वी नदीला बारमाही पाणी राहात होते. नदीवर आशिया खंडातील क्रमांक दोनचे धरण बांधल्यानंतर नदी कोरडी राहू लागली. शेवटच्या टोकापर्यंत ना नदीचे पाणी पोहोचले, ना कालव्याचे. त्यामुळे काठच्या शेतकऱ्यांवर संकट कोसळले. आता तर रब्बी व उन्हाळी हंगाम हातचा जात आहे. पावसाळ्यात पुराचे, तर हिवाळा व उन्हाळा नदी कोरडी असल्याचे संकट, नागरिकांना सोसावे लागत आहे. परिणामी ही नदी शेतकºयांसाठी कर्दनकाळ ठरली.
इसापूरचा कालवा तेलंगणा सीमेवर, तर डावा कालवा विदर्भातील उमरखेड तालुक्याच्या शेवटापर्यंतसुद्धा पोहोचला नाही. नदी काठच्या गावातील कालव्यांची स्थिती अतिशय दयनीय आहे. त्यामुळे नदी काठावरील शेतकºयांनी आता पैनगंगेलाच तिसºया कालव्याचा दर्जा देण्याची मागणी केली.
इसापूर डाव्या कालवा, कयाधू शाखा कालव्याचे काम त्वरित पूर्ण करून सुरु असलेल्या पाणी पाळ्या नदी पात्रात आवश्यक तेथून सोडून सहस्त्रकुंडपर्यंत पाणी पोहोचवा, अशी मागणी केली.
नदी काठावरील ९० गावांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावे आणि त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलनाचे रुपांतर आमरण उपोषणात करण्याचा इशारा दिला आहे. नदी कोरडी पडल्याने या गावांवर उन्हाळ्यात पाणीटंचाईचे सावटही पसरणार आहे.

Web Title: Panganga Terra villages are in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी